Crime esakal
नाशिक

Nashik Crime: येवल्यात पत्नीवर कोयत्याने वार; घरगुती वादातून घटना, संशयित पतीस पोलीसांनी घेतले ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

येवला : शहरातील वर्दळीच्या विंचूर चौफुलीवर मंगळवारी (ता.३) सायंकाळी सहाच्या दरम्यान घरगुती वादावरून पतीने पत्नीवर धारदार कोयत्याने वार केले. संशयित पतीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Yeola husband wife stabbed with spear Incident due to domestic dispute suspect husband detained by police nashik crime)

मंगळवारी आठवडेबाजार असल्याने शहरात मोठी गर्दी होती. शहरातील विंचूर चौफुली या वर्दळीच्या ठिकाणी अरुण रतन दाभाडे (वय ३०, रा. कोपरगाव टाकळी) याने पूजा अरुण दाभाडे (वय २६, रा. महात्मा फुले कॉलनी, येवला) यांच्यात वाद झाला.

वादात संशयिताने लोखंडी कोयत्याने पत्नीवर अगदी भररस्त्यात प्राणघातक हल्ला केला. नागरिकांनी जखमी महिलेस उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर महिलेस शिर्डी येथे हलविण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस निरीक्षक नंदकुमार कदम, उपनिरीक्षक दिनेश लोखंडे, सूरज मेढे, हवालदार बाबा पवार, गणेश पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली व संशयितास ताब्यात घेतले.

या घटनेप्रकरणी शहर पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. संशयित अरुण दाभाडे हा भारतीय लष्करात सेवेत असून, तो एक महिन्यापूर्वी सुट्टीवर घरी आला होता. अरुण व पूजा दाभाडे या दांपत्यास एक मुलगा व एक मुलगी, असे दोन अपत्य आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT