Nashik Sakal YIN : ‘सकाळ’ (यिन)तर्फे यिन केंद्रीय कॅबिनेटचे दोनदिवसीय अधिवेशन सपकाळ नॉलेज हब अंजनेरी येथील शैक्षणिक संकुलाच्या मुख्य सभागृहात शुक्रवार (ता. २१)पासून असणार आहे.
शुक्रवारी व शनिवारी (ता. २२) विविध मान्यवरांच्या उपस्थितीत केंद्रीय कॅबिनेटच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन आणि दिशा देण्यासाठी शैक्षणिक सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. (Yin Central Cabinet meeting in Nashik from today news)
नाशिक येथील केंद्रीय कॅबिनेटचे दोनदिवसीय अधिवेशन विविध सत्रांच्या माध्यमातून चालणार आहे. सभापती व उपसभापती यांच्या अध्यक्षतेखाली या अधिवेशनाचे कामकाज सुरू होणार असून, उद्घाटनाच्या पहिल्या सत्रातच दहा समित्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, तसेच सदस्य त्या-त्या समितीच्या विविध प्रश्नांवर आपले विचार मांडतील. त्यानंतर या संपूर्ण चर्चेचे अवलोकन अहवालात झाल्यावर केंद्रीय कॅबिनेटचे बिल तयार होईल.
दुपारच्या सत्रात १० समित्यांचे प्रमुख सभागृहात संपूर्ण आढावा घेतील. त्यात केंद्रीय कॅबिनेटचा अजेंडा, यानंतरचे होणारे अधिवेशन, देश पातळीवरील संघटनात्मक बांधणी, संशोधनात्मक कामकाजावर चर्चा होईल. सायंकाळी कविसंमेलन होणार असल्याचे केंद्रीय कॅबिनेटच्या सभापती दिव्या भोसले यांनी सांगितले.
"सकाळ’ने ‘यिन’च्या माध्यमातून प्रत्येक महाविद्यालयातील तरुणाईला स्वतःची वेगळी ओळख करून देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. अभिजित पवार सरांनी सुरू केलेली ही चळवळ आता देश पातळीवर काम करते, ही कौतुकास्पद बाब असून, पहिल्यांदाच नाशिक येथे होत असलेल्या यिन केंद्रीय कॅबिनेट अधिवेशनासाठी सपकाळ नॉलेज हबची निवड केली, त्याबद्दल ‘सकाळ’ परिवाराचे आभार." - डॉ. रवींद्र सपकाळ, अध्यक्ष, सपकाळ नॉलेज हब
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
"सकाळ माध्यम समूह’ आयोजित यिन केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळातर्फे देशभरातील विविध प्रश्नांवर चर्चा होऊन राज्यभरातून विद्यार्थी एकत्र येत विविध विषयांवर अहवाल सादर करणार आहेत. माझ्यासारख्या पर्यावरणप्रेमी व्यक्तीला संवाद साधण्याची संधी मिळते, हे आनंददायी आहे."- बाळासाहेब पानसरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
"सकाळ माध्यम समूहा’ने सुरू केलेली ही चळवळ आज राज्यांमध्ये विविध पातळ्यांवर सक्रिय काम करीत आहे. विविध समित्यांच्या माध्यमातून देशपातळीवरील समस्या सोडविण्यासाठी आणि विविध तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून आपल्या उद्योग-व्यवसायात प्रगती करताना हे व्यासपीठ खूप महत्त्वाचे काम करीत आहे".- दिलीप धात्रक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
"शिक्षण क्षेत्रात व्यावसायिक दृष्टिकोन नसल्याने अनेक युवक त्रस्त आहेत. अशा असंख्य युवकांना सोबत घेऊन राज्यभरासह देशभरात व्यक्तिगत सामाजिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून, विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम यिन केंद्रीय कॅबिनेट अधिवेशनाच्या माध्यमातून होत आहे. शालेय शिक्षणातील नीतिमूल्यांच्या शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षणाची सध्या तरुणाईला मोठ्या प्रमाणात गरज आहे." - राहुल पापळ, प्रसिद्ध उद्योजक
"महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना व्यावसायिक शिक्षणाच्या दृष्टिकोनातून तरुणाईने पाऊल टाकले पाहिजे. स्पर्धात्मक जीवनात आपल्याला टिकायचे असेल तर वेगळेपण सिद्ध करावे लागेल. यासाठी ‘सकाळ’- यिन व्यासपीठाच्या माध्यमातून चाललेले हे कार्य उल्लेखनीय आहे." - टीना धरमसी, जागतिक कीर्तीच्या फिल्म डिझायनर
"केंद्रीय कॅबिनेटच्या १० समित्या विविध विषयांवर काम करीत असून, या समित्यांबद्दलची माहिती व दिशा देण्यासाठी माझ्यासारख्या अनेक सहकाऱ्यांनी या चळवळीला प्रोत्साहन दिले आहे. ही चळवळ देशपातळीवरील नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावरील व्हावी, अशी माझ्यासारख्या अनेक सहकाऱ्यांची इच्छा आहे." - तन्मय दीक्षित, राष्ट्रपती पुरस्कार विजेते
"औद्योगिक क्षेत्रात तरुणाईला खूप चांगले दिवस आहेत. ‘सकाळ माध्यम समूहा’ने व्यावसायिक व औद्योगिक क्रांती उभारण्यासाठी यिन हे हक्काचे व्यासपीठ उभे केले. अर्थक्रांतीला बळकटी देण्यासाठी तरुणांनी नोकरीच्या मागणीसाठी वेळ न दवडता व्यवसाय उभारणीसाठी कार्यतत्परता दाखविणे आवश्यक आहे." - बबन चकोर, युवा उद्योजक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.