- नाशिक यिन शॅडो कॅबिनेट महापौरपदी वेदांत सोनवणे, जि. प. अध्यक्षपदी विशाल मते
- यिन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी परीक्षा, मुलाखत प्रक्रिया
नाशिक : विविध प्रश्नांतून उमेदवारांचे सामान्यज्ञान, सामाजिक दृष्टिकोन, आकलन क्षमतेची पडताळणी केली. तर मुलाखतीतून त्यांचे ध्येय-धोरण जाणून घेत त्यांच्यातील चपळतेची चाचपणी शुक्रवारी (ता. १७) करण्यात आली.
यानंतर अव्वल उमेदवारांतून मतदानाच्या माध्यमातून यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) जिल्हा पदाधिकारी निवड केली. सातपूर येथील ‘सकाळ’च्या कार्यालयात झालेल्या या प्रक्रियेत सहभागी महाविद्यालय प्रतिनिधींनी पदाधिकारी होण्यासाठी सचोटीचे प्रयत्न केले. (YIN Ministry Vedanta Bachchao as District President Darshan Deore as Working President nashik news)
या वेळी ‘यिन’ जिल्हाध्यक्षपदी वेदांत बच्छाव, कार्याध्यक्षपदी दर्शन देवरे, नाशिक यिन शॅडो कॅबिनेट महापौरपदी वेदांत सोनवणे व जिल्हा परिषद अध्यक्षपदी विशाल मते यांची निवड झाली.
या संपूर्ण प्रक्रियेत परीक्षक म्हणून पिंपळगाव बसवंत येथील मविप्र संस्थेच्या क. का. वाघ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ज्ञानोबा ढगे, सिडकोतील कर्मवीर शांतारामबापू कोंडाजी वावरे (केएसकेडब्ल्यू) महाविद्यालयातील प्रा. डॉ. मीनाक्षी गवळी, महापालिका शाळेतील शिक्षिका कुंदा बच्छाव-शिंदे यांनी काम पाहिले.
काही दिवसांपूर्वी महाविद्यालय पातळीवरून निवडणूक प्रक्रिया राबवताना महाविद्यालय प्रतिनिधी निवड करण्यात आली होती. या महाविद्यालय प्रतिनिधींतून ‘यिन’ पदाधिकारी निवडीसाठी शुक्रवारी प्रक्रिया पार पडली.
या वेळी प्रारंभी लेखी परीक्षा घेण्यात आली. उपस्थित सर्व महाविद्यालय प्रतिनिधींना विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडाविषयक प्रश्न विचारताना, त्यांचा दृष्टिकोन समजून घेण्यात आला. यानंतर सर्व उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया पार पडली.
परीक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीनंतरचे गुण व मुलाखतीचे गुण अशी एकूण गुणवारी करण्यात आली. प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी उत्तरपत्रिका किंवा मुलाखतीदरम्यान उमेदवाराचे नाव किंवा वैयक्तिक तपशील पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आला व कोड क्रमांकानुसार उरपत्रिका तपासणी व मुलाखतीची प्रक्रिया पार पडली.
या वेळी जिल्हाध्यक्षपदासाठी केटीएचएम महाविद्यालयातील वेदांत बच्छाव याची मतदानाने निवड झाली. तर कार्याध्यक्ष पदासाठी सपकाळ औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील दर्शन देवरे याची निवड झाली.
नाशिक महापौर व जिल्हा परिषद अध्यक्ष या पदांसाठी मतदानाने उमेदवारांची निवड करण्यात आली. यामध्ये के. के. वाघ कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील वेदांत सोनवणे याची नाशिक यिन शॅडो कॅबिनेट महापौरपदी निवड झाली.
मविप्र संस्थेच्या कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयातील विशाल मते याची जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी निवड झाली. या संपूर्ण निवड प्रक्रियेचे संयोजन ‘यिन’चे विभागीय अधिकारी गणेश जगदाळे यांनी केले.
मान्यवरांचे स्वागत ‘सकाळ’ वितरण विभागाचे वरिष्ठ प्रतिनिधी निखिल रोकडे यांनी केले. --चौकट प्रतिनिधींनी घेतली कर्तव्याची शपथ कार्यक्रमादरम्यान गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महाविद्यालय प्रतिनिधींनी कर्तव्याची शपथ घेतली.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
‘यिन’च्या जिल्हा समितीचा सदस्य म्हणून शपथ घेतांना, आपल्या कार्यकाळात विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करताना त्यांचे प्रश्न सोडवित, सामाजिक जाण राखणार असल्याची ग्वाही या शपथविधीतून दिली.
"विद्यार्थीदशेत नेतृत्वगुण विकास झाल्यास चांगले करिअर घडविण्यास उपयोग होतो. ‘यिन’ व्यासपीठाच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून युवानेतृत्व घडत असून, सोबतच सुजाण नागरिक घडत असल्याने समाजात सकारात्मक परिवर्तन बघायला मिळत आहे. युवकांना योग्य दिशा दाखवत त्यांची ऊर्जा सामाजिक उपक्रमांत उपयोगी येत असल्याचे समाधान वाटते."
- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त (गुन्हे शाखा), नाशिक
" ‘यिन’ने विद्यार्थ्यांना चांगले व्यासपीठ दिले आहे. नेतृत्व करण्यासाठी गुणकौशल्ये विकसित करताना सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही सर्वसमावेशक संधी उपलब्ध झाली आहे. विद्यार्थी, युवकांचे मोठे प्रश्न असून, ‘यिन’ व्यासपीठाद्वारे सोडवणुकीसाठी प्रयत्न व्हावा."
- प्रा. डॉ. ज्ञानोबा ढगे, उपप्राचार्य, क. का. वाघ महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत
"उपस्थित सर्वच युवकांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असल्याने परीक्षक म्हणून विविध पदांकरिता उमेदवारांची निवड करणे आव्हानात्मक होते. प्रत्येकाला योगदानाची संधी असून, आपल्याला दिलेल्या पदाची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडावी."
- प्रा. डॉ. मीनाक्षी गवळी, केएसकेडब्ल्यू महाविद्यालय
"युवकांविषयीचे प्रश्न मांडण्यासाठी अत्यंत भक्कम व्यासपीठ ‘यिन’च्या माध्यमातून उपलब्ध आहे. स्थानिक स्तरावर प्रतिनिधींनी आपले अस्तित्व निर्माण करावे. आपले सामाजिक काम हीच आपली ओळख बनवावी." - कुंदा बच्छाव-शिंदे, शिक्षिका, नाशिक महापालिका शाळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.