winery  google
नाशिक

नाशिकची यॉर्क वायनरी लवकरच होणार सुला विनयार्डस‌मध्ये विलीन

अरुण मलानी

देशातील आघाडीची वाइन उत्‍पादक कंपनी असलेल्‍या सुला विनयार्डस‌ने नाशिक येथील यॉर्क वायनरीचे आपल्यासोबतच्या विलीनीकरणाची घोषणा केली आहे.

नाशिक : देशातील आघाडीची वाइन उत्‍पादक कंपनी असलेल्‍या सुला विनयार्डस‌ने (sula vineyards) नाशिक येथील यॉर्क वायनरीचे आपल्यासोबतच्या विलीनीकरणाची घोषणा केली आहे. लवकरच यॉर्क वायनरीवर सुलाची संपूर्ण मालकी प्रस्थापित होणार असल्याचे शनिवारी (ता. २२) जाहीर करण्यात आले. (york winery in nashik will soon be merged with sula vineyards)

याविषयी सुला विनयार्डचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव सामंत म्‍हणाले, की विलीनीकरण यॉर्क, सुला आणि वाइन ग्राहकांसाठी मिळून एक तिहेरी विजय आहे. छोट्या वायनरींना वितरण व्‍यवस्‍था निर्माण करणे आव्हानात्‍मक बाब होती. त्यातच कोरोना महामारीच्‍या काळात वाइन उद्योगास मोठा फटका बसला आहे. कैलाश गुरनानी यांची वाइनमेकर आणि ब्रँड अँबेसिडर म्‍हणून नियुक्ती कायम ठेवली जाणार असून, सुला ही यॉर्कला अधिक व्यापक वितरण मिळवून देण्यास आणि गुरनानी कुटुंबाची वाइन उत्पादन करण्याची परंपरा कायम ठेवण्यास मदत करेल.

यॉर्क वायनरीच्या लेबलचे हक्कदेखील सुलाकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. आम्ही आमच्या शेजारीच असलेल्या यॉर्ककडे आमचे हॉस्पिटॅलिटी विभागाचे कामकाजदेखील विस्तारित करणार आहोत. यामुळे नाशिकच्या वाइन पर्यटनाला अधिक चालना मिळणार आहे. तसेच, एकत्रित कामकाजातून अधिक चांगला समन्वय साधण्यात येणार आहे. देशभरातील अधिकाधिक ठिकाणी यॉर्कचे ब्रँड उपलब्ध होणार असून, वाइनप्रेमींना आस्‍वाद घेता येईल. हा एकंदरीत सर्वांसाठी एक सुवर्णमध्य साधला जाणार असल्‍याचे सामंत यांनी नमूद केले आहे.

सुला ही भारतातील अग्रगण्य आणि सर्वांत मोठी वाइन उत्पादक कंपनी असून, ६५ टक्क्यांपेक्षा अधिक बाजारपेठ काबीज केलेली आहे. तसेच, वाइन पर्यटनाबाबतही सुला भारतात अग्रेसर आहे. या वर्षाच्या सुरवातीस लॉकडाउन शिथिल असताना, सुला विनियार्डच्या ५१ रूम असलेल्या रिसॉर्टमध्ये ९५ टक्‍के रूमकरिता नोंदणी झालेली होती.

दरम्यान, या विलीनीकरणामुळे यॉर्कचा ब्रँड अजूनही वाढतच जाईल, असे यॉर्क वायनरीचे संचालक रवी गुरनानी यांनी सांगितले. विलीनीकरण आमच्या ब्रँडला अधिक चांगले वितरण उपलब्ध करून देईल व बाजारपेठेतील आमचे स्‍थान वाढवेल. या करारानुसार सुला वाइन पर्यटनासाठी यॉर्कमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांचा वापर करू शकेल. ज्यात टेस्टिंग रूम आणि रेस्टॉरंट यांचा समावेश आहे. तसेच, यॉर्क वायनरीची उत्पादन क्षमता चार लाख लिटर इतकी असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले.

(york winery in nashik will soon be merged with sula vineyards)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khanapur Assembly Election 2024 Results : सुहास बाबर यांना विक्रमी 27 हजाराचे मताधिक्य; तानाजीराव पाटील ठरले किंगमेकर!

Wani Assembly Election Results 2024 : वणी मतदारसंघात शिवसेनेची मशाल पेटली! संजय दरेकरांचा दणक्यात विजय

Raju Navghare Won Wasmat Assembly Election 2024 Result : दुरंगी लढतीत राजू नवघरे विजयी; जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव

Aurangabad West Assembly Election 2024 Result Live: शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत संजय शिरसाटांनी राखला गड

Mahesh Choughule Won in Bhiwandi West Assembly Election : भिवंडी पश्चिम मतदार संघावर तिसऱ्यांदा भाजपचा झेंडा; महेश चौघुलेंची बाजी

SCROLL FOR NEXT