asparagus  Sakal
नाशिक

युवा शेतकऱ्यांची औषधी शतावरीची लागवड, इतरांसाठी ठरतेय नवा पर्याय

सकाळ डिजिटल टीम

कळवाडी (जि. नाशिक) : धान्यपिके, कडधान्ये, भाजीपाला, फळपिके, फुलपिके ही पारंपरिक पिके सोडून कळवाडी येथील युवा शेतकरी प्रशांत आप्पासाहेब खैरनार व समाधान खैरनार यांनी शतावरीसारख्या वनौषधींची लागवड करुन शेतीव्यवसायात नवी वाट स्विकारत तरुण शेतकऱ्यांसाठी नवा पर्याय उभा केला आहे.

या पिकासाठी माळमाथ्यावरील पाण्याचा निचरा होणारी, हलकी, रेताड किंवा मुरमाड जमीन व कमी पाणी ही वैशिष्ट्ये असणारी जमीन असल्याने त्यांनी आपल्या चार एकर शेतीत चाळीस हजार रोपांची लागवड केली. त्यासाठीची रोपे त्यांनी उत्तराखंड येथून सहा रुपये पोहोच प्रतीरोप या भावाने मागवली. लागवडीअगोदर शेतीची पूर्वमशागत करताना त्यांनी नांगरणी करुन जमीन भुसभुशीत केली. ठराविक अंतरावर रोपांची लागवड करुन या पद्धतीने सेंद्रीय खत दिले. सर्वसाधारण प्रतीएकर साठ हजार इतका खर्च आला असून, शतावरीचे उत्पन्न येण्यास साधारण एक वर्ष ते दीड वर्ष इतका कालावधी लागतो. या वनस्पतींच्या मुळ्यांचा आयुर्वेदिक औषधात जास्त उपयोग होत असून, ॲलोपॅथी व इतर उपचार पद्धतीत देखील वापर होतो. एका झाडापासून चार ते पाच किलो इतक्या मुळ्या निघतात व प्रतिकिलो पंधरा ते वीस रुपये इतका भाव मिळतो. वर्षभरात साधारण ७५ हजार रुपये महिना याप्रमाणे चार ते दहा लाख रुपये एकर इतके उत्पन्न मिळते, असे त्यांनी सांगितले. शतावरीची करार पद्धतीने शेती केली जात असून, विविध औषध निर्मिती कंपन्यांकडून वीस रुपये किलो या हमी भावाने त्यास खूप मागणी आहे. तसेच, या पिकांत आंतरपीक म्हणून अश्‍वगंधाची देखील त्यांनी लागवड केली आहे. यात त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला आहे.

शतावरीचे औषधी उपयोग

सूक्ष्मजीवांची वाढ रोखत असल्याने अँटिबायोटिक म्हणून, संधीवात, अर्धांगवायूत, मासिक पाळीच्या समस्यांवर, दुग्धवर्धक, हार्मोनचे कार्य, लैंगिक क्षमता वाढवणे, पेप्टीक अल्सर कमी करणे, अतिसारापासून सुटका, केसांच्या समस्यांवर, रक्तशर्करा कमी करणे, प्रतिकारक्षमता वाढवणे, पित्तशामक, कर्करोग टाळते.

बेभरवशाचे पर्जन्यमान, बाजारभाव, मजुरांची समस्या यामुळे पारंपारिक पिके करणे अवघड झाले आहे. त्यामुळे खात्रीशीर उत्पन्नाची हमी म्हणून या पिकाकडे आम्ही वळलो.
- प्रशांत खैरनार, युवा शेतकरी

आयुर्वेदिक औषधांमध्ये विविध आजारांवर गुणकारी असल्याने विविध औषध निर्मिती कंपन्यांकडून मोठी मागणी व भावही चांगला असल्याने या वनौषधी पिकाची लागवड फायदेशीर ठरली.
- समाधान खैरनार, प्रयोगशील शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT