सिडको (नाशिक) : स्वातंत्र्यदिनाचे (independence day) औचित्य साधत पोलिस आयुक्त दीपक पांडे (police commissioner deepak pandey) यांनी शहरात ‘नो हेल्मेट - नो पेट्रोल’ (no helmet no petrol) हे धोरण लागू केले. मात्र काही जण ही गोष्ट गांभीर्यांने घेत नसल्याचे समोर येत आहे. दुचाकी चालविताना हेल्मेट न घालणे हे जीवावर बेतू शकतं याच ताजं उदाहरण नाशिकमध्ये समोर आले आहे.
वीस वर्षीय तरूणीचा जागेवरच मृत्यु
बुरकुले हॉल मागील एकदंत नगर येथे राहणारी किरण पाटील ही 20 वर्षीय तरुणी बुधवारी (ता.१८) आपल्या दुचाकीने पाथर्डी फाट्याकडे आपल्या मैत्रिणीकडे जात असताना नम्रता पेट्रोल पंपासमोर तिची गाडी स्लीप झाल्याने ट्रकची धडक लागून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तरुणीने जर हेल्मेट घातले असते तर कदाचित तिचा जीव वाचला असता असे नागरिकांचे म्हणणे आहे. किरण पाटील एकदंत नगर येथे आपल्या परिवारासह राहते. दुपारच्या वेळेला पाथर्डी फाटा येथे राहणाऱ्या आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी ती दुचाकीवरून निघाली. तेथील पेट्रोल पंप समोरील पानटपरीजवळ अचानक तिची गाडी डांबरी रस्त्याच्या कडेला स्लिप झाली. त्याच वेळी समोरून येणाऱ्या ट्रकने तिला धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. या तरुणीने जर हेल्मेट घातले असते तर कदाचित तिचा जीव वाचला असता असे नागरिकांचे म्हणणे आहे. यासंदर्भात अंबड पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाचे काम सुरू आहे.
नाशिककरांनो गांभार्याने घ्या...
नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नुकतेच पेट्रोल भरतांना पेट्रोल पंपावर हेल्मेट असल्याशिवाय पेट्रोल देता येणार नाही.अशा प्रकारचा आदेश काढला आहे. काहीजण या आदेशाची अंमलबजावणी करताना दिसत नाही. हेल्मेट घालण्याचा उद्देश हा त्या दुचाकी स्वाराला संरक्षण मिळावे व त्यांचा जीव वाचावा हा असताना काही जण याकडे दुर्लक्ष करत असल्याने अशा प्रकारच्या अपघातामध्ये मृत्यु होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेतली नाही तर खरोखर अपघातात जीव वाचण्याचे प्रमाण वाढेल एवढं मात्र नक्की .
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.