YIN esakal
नाशिक

YIN वर्धापन दिनानिमीत्त तरुणाईचा जल्लोष

प्रतीक जोशी

नाशिक : तरुणाईच्या हक्काचे व्यासपीठ म्हणजेच 'सकाळ' माध्यम समूहाचे यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (YIN). १९ ऑगस्ट २०१४ रोजी सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार यांच्या संकल्पेनेतून यिनची स्थापना करण्यात आली. तरुणाई घडविण्याचे काम अविरतपणे करणारे यिन आता आठव्या वर्षात पदार्पण करत आहे. यिनच्या आठव्या वर्धापन दिनानिमीत्त रक्तदान शिबीर यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

यिनच्या आठव्या वर्धापन दिनानिमीत्त जिल्हाधिकारी गंगाथरण डी., नाशिक पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, अभिनेते चिन्मय उदगीरकर, शिक्षणतज्ज्ञ सचिन जोशी, विनय बेळे, सुनिल शर्मा, 'सकाळ' उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर, यिन राज्य व्यवस्थापक श्यामसुंदर माडेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रम संपन्न होणार आहे.

यिन व्यासपीठाच्या माध्यमातून गेली आठ वर्षे महाराष्ट्रातील हजारो महाविद्यालयांमध्ये तरुणाईमधील नेतृत्व विकास कार्यक्रमाअंतर्गत व्यक्तिमत्व विकास, उद्योजकता विकास, आर्थिक साक्षरता, योग अभ्यास, सामाजिक सेवा, मानसिक आणि आरोग्य स्वास्थ अशा विविध स्तरांवर यिन तरुणांमधील नेतृत्व गुणांना घडविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणाईला एकत्र करुन त्यांचे हात बळकट करण्यासाठी यिन सदैव काम करत आहे.

यिनच्या आठव्या वर्धापन दिनानिमीत्त 'सकाळ'च्या सातपुर कार्यालयात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. याचसोबत मान्यवरांच्या हस्ते यिन सदस्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. यिन केंद्रीय कॅबिनेट क्रीडा समिती उपाध्यक्ष, आंतरराष्ट्रीय मानांकित बुद्धीबळपटु विनायक वाडिले यांचे 'एव्हिल आय ऑफ चेस' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यांसह दत्तनगरी ढोल ताशा पथकाचे सादरीकरण, योगा नृत्य, प्लास्टिक बँड अशा विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन तरुणांनी मोठ्या संख्येने उत्साहात सहभाग नोंदवावा असे आवाहन यिन उत्तर महाराष्ट्र विभागिय अधिकारी गणेश जगदाळे यांनी केले आहे.

यिन सोबत स्वतःला जोडण्यासाठी आजच यिन अॅप डाऊनलोड करा. अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्यू आर कोड स्कॅन करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT