young man beaten by group of men in yeola video goes viral Nashik Crime Chhagan Bhujbal deepak kedar  
नाशिक

Nashik Crime : 'हाताला लागलंय, खाऊ गल्लीत ये...' म्हणत मैत्रिणीने बोलावलं; येवल्यात तरुणाला बेदम मारहाण

सकाळ वृत्तसेवा

येवला : येथील एका तरुणाला चार ते पाच जणांच्या जमावाने केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी संताप व्यक्त होत असून शहर पोलिसात याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान काही पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आज शहर पोलीस ठाणे गाठून दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

१७ जून रोजी घडलेल्या घटनेचा हा व्हिडिओ आहे. याप्रकरणी काल (ता.७) गुन्हा दाखल झाला असून ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी ट्विटरवर या व्हिडिओ संदर्भात कारवाईची मागणी केल्यानंतर हा प्रकार पुढे आला आहे. मारहाण झालेल्या पीडित युवकाने शहर पोलिसात या प्रकरणी फिर्याद दिली असून आरोपीच्या भाची सोबत बोलत असताना खाऊगल्ली येथील कॅफेत येऊन या सहा जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर सारसबाग येथे घेऊन जाऊन लाथाबुक्क्यांनी, काठीने तसेच चाबकाने व बेल्टने बेदम मारहाण केल्याची तक्रार पीडित युवकाने दिली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सहा जणांचे विरोधात गुन्हा देखील दाखल झाला आहे. माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे गुन्हा उशिराने दाखल करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

केदार यांची कारवाईची मागणी

झुंडीने साडे तीन तास या तरुणाला अमानवीय मारहाण केली. मैत्रिणीने कॉल करून मला हाताला लागलंय, खाऊ गल्लीत ये.. म्हणून बोलवले आणि तिथून त्याचे गुंडानी अपहरण करून कोंडून जबर मारहाण केली. त्याचा व्हिडीओ काढला, मोबाईल हिसकवून नेला, त्याच्या कुटुंबाने धाव घेतली तर त्यांना सुद्धा मारहाण दलित महिलेला सुद्धा मारहाण केली. याप्रकरणी ऍट्रॉसिटी ऍक्ट 354 चे कलम लावून तात्काळ आरोपीला अटक करावी, पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे, स्थानिक पोलीस दबावाखाली काम करत असतील तर चौकशी करून त्यांचे निलंबन करावे. आरोपी तात्काळ अटक न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल अशा इशारा केदार यांनी दिला आहे.

भुजबळांचे ट्वीट!

येथील आमदार व मंत्री छगन भुजबळ यांनी ही ट्विट करून महाराणीचा प्रकार संतापजनक व निषेधार्थ आहे.या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी आपण लक्ष ठेवून असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.

पोलीस ठाण्यात जमला जमाव

दरम्यान,आज दुपारी शहर पोलीस ठाण्यात विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जमून दोशींना तत्काळ अटक करावी अशी मागणी केली.या प्रकरणी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्याशी चर्चा करत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही या कार्यकर्त्यांनी दिला. दरम्यान सायंकाळी उशिरा उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनीही येथे येऊन या कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT