young boy death esakal
नाशिक

जव्हार येथील बंधाऱ्यात तरुणाचा मृत्यू; परिसरात हळहळ

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : 19 वर्षाचा हृषीकेश एकुलता एक मुलगा होता. तो नेहमी भजन-कीर्तनाला जायचा. भजनात तबला वाजविण्याचा त्याला छंद होता. धार्मिक उपक्रमांमध्ये नेहमी त्याचा सहभाग असायचा. पण काळाचे चक्र असे फिरले कि भजन किर्तन करणाऱ्या हृषीकेशला मात्र देवाचंच बोलावणं आलं अशी चर्चा सध्या नागरिकांत होत असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (young-man-drowned-death-nashik-marathi-news)

आठ दिवसांतील दुसरी घटना

उत्तमनगर व उपेंद्रनगर भागातील १७ ते १८ युवक दुचाकींवरून फिरण्यासाठी जव्हार, मोखाडा भागात गेले होते. तेथील बंधाऱ्यालगत फिरत असताना, हृषीकेश सोनवणे (वय १९, रा. उत्तमनगर) याचा पाय घसरला व तो बांधाऱ्यात पडला. बंधारा खोल असल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. या संदर्भात मोखाडा पोलिसांना माहिती कळविल्यानंतर प्रशासनाने नागरिकांच्या मदतीने शोधाशोध करून मृतदेह पाण्यातून काढून मोखाडा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. हृषीकेश याच्या मागे आई, वडील व दोन बहिणी असा परिवार आहे.उत्तमनगरमधील १९ वर्षीय तरुणाचा जव्हार येथील बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला. सिडकोमधील आठ दिवसांतील दुसरी घटना असून, यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Latest Marathi News Updates live : लाडक्या बहिणींना आता महिन्याला 2100 रुपये मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT