Youngistan National Convention to Kerala in September sakal yin news College
नाशिक

Sakal YIN News : केरळला सप्टेंबरमध्ये ‘यंगिस्तान राष्ट्रीय अधिवेशन’; सभापती दिव्या भोसलेंची घोषणा

सकाळ वृत्तसेवा

Sakal YIN News : ‘सकाळ’ केंद्रीय यिन पावसाळी अधिवेशनात शनिवारी (ता. २२) दुसऱ्या दिवसातील शेवटच्या सत्रात सप्टेंबरमध्ये केरळला ‘यंगिस्तान राष्ट्रीय अधिवेशन’ होणार असल्याची घोषणा केंद्रीय यिन सभापती दिव्या भोसले यांनी केली.

राष्ट्रीय अधिवेशनाची घोषणा करताच कॅबिनेटमधील सहकाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. (Youngistan National Convention to Kerala in September sakal yin news)

दिव्या भोसले म्हणाल्या, नाशिकमध्ये पार पडलेल्या केंद्रीय पावसाळी अधिवेशनानंतर ऑगस्टमध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

१४ व १५ सप्टेंबरला होणाऱ्या ‘यंगिस्तान राष्ट्रीय अधिवेशन’ मध्ये देशातील २८ राज्य व नऊ केंद्रशासित प्रदेशांचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. या अधिवेशनाचे समन्वयन दिव्या भोसले करीत आहेत.

पंढरपूरला हिवाळी अधिवेशन

ऑगस्टमध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. पंढरपूर येथे दोनदिवसीय हिवाळी अधिवेशन असणार आहे. तीन सत्रात हे अधिवेशन पार पडेल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

२५ व २६ नोव्हेंबरला होणाऱ्या अधिवेशन स्वागताध्यक्षपदी स्त्री समिती प्रतिष्ठा समिती अध्यक्ष सायली वाडदेकर, उद्योजक समिती उपाध्यक्ष प्रसाद सातपुते, राजकीय समिती संघटक ॲड. सत्यम धुमाळ असणार आहेत. अधिवेशनानंतर डिसेंबरमध्ये यिनचे केंद्रीय कॅबिनेट शिष्टमंडळ पंतप्रधान, राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मंत्र्यांच्या भेटी घेणार आहेत.

‘शोधू या स्वतःला, समजू या देशाला’

सकाळ- यिन केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळ महात्मा गांधी जयंतीपासून ‘शोधू या स्वतःला, समजू या देशाला’ यात्रा देशभर काढण्याचे नियोजन आहे. या यात्रेचा प्रारंभ सेवाग्राम (गुजरात) येथून होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: बंदी असूनही जड वाहने रस्त्यावर, वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण

Sangamner Assembly Election 2024 : विरोधकांना जनता धडा शिकविल, संगमनेरमधील विविध गावांत युवा संवाद यात्रेचे स्वागत

WTC 2025 Points Table: भारताचे टेंशन वाढले; न्यूझीलंडने बंगळुरू कसोटी जिंकत फायनलचे दार ठोठावले

Smashed Cucumber Salad: दुपारच्या जेवणाचा आनंद होईल द्विगुणित, शेफ कुणाल कपूरच्या स्टाईलने बनवा काकडी अन् दह्याचे स्वादिष्ट सॅलड, पाहा Video

Latest Maharashtra News Updates LIVE : निलेश राणे वर्षा बंगल्यावर दाखल

SCROLL FOR NEXT