dhananjay ahire esakal
नाशिक

Nashik News : आराईतील तरुणाचा सटाण्यातील अपघातात मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

सटाणा (जि. नाशिक) : शहरातील मालेगाव रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ गुरुवारी (ता.१) रात्री अकराच्या सुमारास दुचाकी घसरून तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. आराई (ता. बागलाण) येथील धनंजय परशुराम अहिरे (वय २०) असे तरुणाचे नाव आहे. बागलाण पंचायत समितीचे माजी उपसभापती परशुराम अहिरे यांचा तो एकुलता एक मुलगा होता.

सटाणा शहराकडून रात्री आराई येथे धनंजय अहिरे आपल्या घरी जात होता. याचवेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारालगत धनंजयची दुचाकी अचानक घसरली. तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या व्यापारी संकुलाच्या कठड्याला त्याचे डोके आपटले.

यात मार लागल्याने रक्तस्राव झाला. परिसरातील नागरिकांनी तसेच, बाजार समितीच्या सुरक्षा रक्षकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या धनंजयला त्यांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार मिळण्यापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हेही वाचा : वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

या घटनेची माहिती सटाणा शहर व आराई गावात पसरताच पोलिस, नातेवाईक व ग्रामस्थांनी सटाणा ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. आज शुक्रवारी सकाळी धनंजयचे शवविच्छेदन करून नातेवाइकांकडे मृतदेह सुपूर्द करण्यात आला. आराई येथील स्मशानभूमीत धनंजयवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी तालुक्यातील राजकीय, सामाजिक, कृषी क्षेत्रासह ग्रामस्थ व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. धनंजय हरहुन्नरी व होतकरू तरुण होता. मनमिळाऊ स्वभावामुळे त्याचा मोठा मित्रपरिवार होता. त्याच्या अपघाती निधनामुळे तालुक्यासह ग्रामस्थ व मित्रपरिवारामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबावरही मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT