Social Media Addiction esakal
नाशिक

Social Media Addiction : रिल्समधील तुमची ओळख आहे आभासी; व्यसन ठरणार घातक...!

दिगंबर पाटोळे

Nashik News : आधुनिकतेच्या युगात सर्वांच्याच हाती स्मार्टफोन आले. माणसांच्या गरजा जशा वाढत गेल्या तसे तसे नवे फीचर्स अँड्रॉइड फोनमध्ये दाखल झाले आहेत. याचा काहींनी चांगला उपयोग केला तर काहींनी दुरुपयोग. (youth is addicted to social media reels nashik news)

तरुणांसह जवळपास सर्वच जण मोबाईलमध्ये गुरफटून गेले आहेत. संवादाच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या मोबाईलचा अनियंत्रित वापर सुरू झाला आहे. मोबाईलच्या अतिवापराचे सध्या विविध दुष्परिणाम समोर येत असून सध्या रिल्समधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची तरुणाईमधील ही धडपड चिंतेचा विषय बनला आहे.

कोरोनाकाळात सोशल मीडियाच्या वापरात झपाट्याने वाढ झाली. परंतु देशात टिकटॉकसह विविध ॲप्लिकेशन बंद केले. त्यामुळे लाखोंच्या संख्येने फॉलोअर्स असलेल्या टिकटॉक स्टार्सने इन्स्टाग्राम, मौज, युट्यूबसह इतर ॲप निवडण्यास प्राधान्य दिले. हे वापरकर्ते १५, ३० किंवा ६० सेकंदाची रिल्स अथवा युट्यूब शॉर्ट्स (लहान व्हिडिओ) तयार करत आपली लोकप्रियता वाढविण्यावर भर देत आहेत.

महत्त्वाचे म्हणजे रिल्स व शॉर्ट्सच्या माध्यमातून काही हजारांपासून लाखांपर्यंत पैसे कमविण्याचे संधी उपलब्ध आहे. दुसऱ्या बाजूने रिल्स बनविण्याच्या नादात अपघात होऊन आपला व दुसऱ्याचे जीवही गमवण्याच्या घटनांबरोबर सायबर क्रॉईमचे गुन्हे दाखल होऊन अनेकांची जेलवारीही होत असल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

यात तरुणाई मोठ्या प्रमाणात अडकलेली दिसते. प्रवास असो की घर, आसपास पाहिले तर जो तो रिल्स पाहण्यात अन् व्हिडीओ बनवण्यात गुंतला आहे. लाईक, शेअर अन सबस्क्राईबच्या जाळ्यात प्रत्येक जण गुरफटला आहे. मग या रिलला जादा लाईक मिळवण्यासाठी विविध करामतीदेखील केल्या जात आहेत, पण रिल बनवण्याची ही नशा अनेकांसाठी नैराश्याच्या गर्तेत घेऊन जाण्यास निमित्त ठरत आहे.

अतिरेकाचे विविध दुष्परिणाम

केवळ तरुणच नव्हे तर मोठी माणसेही आपली कामे बाजूला ठेवून कायम रिल्स पाहण्यात गुंतलेले असतात. सोशल मीडिया हा संवाद आणि मनोरंजनाचे महत्त्वाचे साधन बनला असला तरी त्याचा अतिरेक आरोग्यासाठी घातक आहे.

शाळकरी मुले तासनतास मोबाईलमध्ये गुरफटून पडत असल्याने त्यांच्या दृष्टीवर त्याचा वाईट परिणाम होत आहे. अभ्यास व इतर महत्त्वाच्या कामांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. याचा परिणाम थेट मुलांच्या एकाग्रतेवर होत असल्याने पालकांनी याबाबत खबरदारी घेणे आवश्यकता निर्माण झाली आहे.

असे टाळता येईल रिल्सचे व्यसन

सोशल मीडिया ॲपवर फोटो, व्हिडीओ शेअर करू नका. एखाद्या ॲपवर फोटो, व्हिडीओ शेअर केले नाहीत, तर त्यावर स्क्रोल करत राहण्याचे एक कारण कमी होते. इन्स्टाग्रामसारखे ॲप केवळ फोटो व व्हिडीओ शेअर करण्यासाठी नसून त्याचे रिल्स पाहणे हेही एक व्यसन आहे; परंतु फोटो व व्हिडीओ शेअर न केल्याने ते पाहण्याची इच्छा कमी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT