खेडभैरव : ‘व्हॅलेंटाईन डे’साठी काही दिवसांपासून तरुणाईची जय्यत तयारी सुरू आहे. कुठे, कधी आणि कोणते गिफ्ट द्यायचे, याचे आराखडे बांधले जात आहेत.
अनेकांनी भेटवस्तू, शुभेच्छापत्रे खरेदी करण्यास सुरवात केली आहे. त्यांच्या सोयीसाठी बाजारातील अनेक दुकाने लाल-गुलाबी रंगांच्या वस्तूंनी सजली आहेत. (Youth ready for Valentine Day 2024 lovely atmosphere in market of igatpuri nashik news)
हल्ली फादर्स डे, मदर्स डे, चिल्ड्रेन डे, अर्थ डे, फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन डे, असे नाना डेज मोठ्या उत्साहात केले जातात. ‘स्नेह’, ‘जिव्हाळा’, ‘आपुलकी’, ‘आस्था’, ‘आवड’, ‘वात्सल्य’, ‘भक्ती’, ‘आदर’, ‘ममत्व’, असे प्रेमाचे अनेक रंग आहेत.
त्यातील एक म्हणजे प्रणयरंग होय. तो प्रेमीयुगुलांचा अतिशय आवडीचा रंग असल्याने व्हॅलेंटाईन डे त्यांच्यासाठी खास असतो.
‘व्हॅलेंटाईन डे’ रोमन साम्राज्यात १५०० मध्ये एका पोपने सुरू केला. हा दिवस महाविद्यालयांतही मोठ्या प्रमाणात साजरा होतो. यंदाही शाळा, महाविद्यालयांमध्ये हा ‘डे’ उत्साहात साजरा केला जाईल. अनेक तरुण-तरुणी समाजमाध्यमांचा वापर करून आपले प्रेम व्यक्त करतील.
त्याचबरोबर सुप्रसिद्ध कलाकारही हा दिवस साजरा करण्याची संधी सोडत नाहीत. अर्थातच हा दिवस साजरा करण्यासाठी प्रत्येक प्रेमीयुगुलाची आपापली एक वेगवेगळी स्टाईल असते.
त्यात ‘व्हॅलेन्टाइन डे’चा मुहूर्त साधून कोणाला ‘प्रेमाची कबुली’ द्यायची असते, तर कोणाला ‘ब्रेकअप’ झाल्यामुळे वेगळ्या अर्थाचे शुभेच्छापत्र द्यायचे असते.
अशा प्रत्येक निरनिराळ्या मजकुरांची शुभेच्छापत्रे बाजारपेठेत दाखल झाली आहेत. मोबाईल आणि इंटरनेटचा प्रसार झाला असला, तरी शुभेच्छापत्रांना चांगलीच मागणी आहे, असे एका विक्रेत्याने सांगितले.
■ ७ फेब्रुवारी : रोज डे
■ ८ फेब्रुवारी : प्रपोज डे
■ ९ फेब्रुवारी : चॉकलेट डे
■ १० फेब्रुवारी : टेडी डे
■ ११ फेब्रुवारी : प्रॉमिस डे
■ १२ फेब्रुवारी : हग डे
■ १३ फेब्रुवारी : किस डे
■ १४ फेब्रुवारी : व्हॅलेंटाईन डे
‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त सध्या विविध दुकाने ‘फ्रेंडशिप बँड’, ‘टेडी बियर’सह निरनिराळ्या भेटवस्तूंनी सजली आहेत. भेटवस्तूंच्या बहुसंख्य दुकानांत अगदी पाच ते दहा रुपयांपासून १०० रुपयांपर्यंतचे विविध धातूंचे, रेशमाचे आकर्षक ‘फ्रेंडशिप बँड’ आहेत.
शुभेच्छापत्रांनाही अधिक मागणी आहे. भेटवस्तूपेक्षाही शुभेच्छापत्रातील शब्दांच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणाऱ्या भावना अधिक महत्त्वाच्या असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.