नाशिक : सार्वजनिक वाचनालयातर्फे प्रथमच आयोजित युवा साहित्य महोत्सवात युवा साहित्यिक प्रमोद घोरपडे याने मोहोर उमटवली आहे. दोनदिवसीय महोत्सवातील विजेत्यांना पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले. मु. श. औरंगाबादकर सभागृहात रविवारी (ता. १२) सोहळा पार पडला. (Yuva Sahitya Mahotsav Pramod Ghorpades Mohor at Yuva Sahitya Mahotsav Prize distribution by MLA Tambe nashik news)
या वेळी सावानाचे उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव, उपाध्यक्ष सुनील कुटे, ग्रंथसचिव जयप्रकाश जातेगावकर, प्रमुख सचिव धर्माजी बोडके, सांस्कृतिक कार्य सचिव संजय करंजकर आदी उपस्थित होते.
युवा साहित्य महोत्सवात १२६ काव्य सादर झाले. त्यापैकी ५० काव्याची निवड झाली आणि अंतिम फेरीसाठी २५ काव्य निवडले. प्रमोद घोरपडे याने सादर केलेली ‘बुधवार पेठ मातृत्व, वाट चालावी चालावी’, या कवितेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
परीक्षक म्हणून मनोहर विभांडिक, रामचंद्र कुलकर्णी व विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी जबाबदारी सांभाळली. सावानाचे सदस्य गणेश बर्वे यांनी आमदार तांबे यांचा परिचय करून दिला.
प्रमुख अतिथींच्या हस्ते गोरख पालवे, विशाल टर्ले, श्रीराम वाघमारे, मंगेश बिरारी, किरण सोनार यांचाही सत्कार करण्यात आला. गिता बागूल यांनी सूत्रसंचालन केले. युवा महोत्सवातील विजेते : प्रथम : प्रशांत घोरपडे, द्वितीय- मानसी कावळे, तृतीय- ऐश्वर्या नेहे, चतुर्थ- अन्सारी अशरफा, शिध्रा विष्णू सोळंकी
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
‘रिल्स’ च्या जमान्यात साहित्यिक घडतात: आमदार तांबे
सोशल मीडियावर ‘रिल्स’ बनवणाऱ्या तरुणांना आता कुठल्याही प्रकाशकाची गरज उरलेली नाही. स्वत: निर्माण केलेले साहित्य ते आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जगापर्यंत पोचवू शकतात.
युवा साहित्यिकांसाठी सोशल मीडिया ही दैवी देणच आहे, असे मत आमदार सत्यजित तांबे यांनी मांडले. सद्यस्थतीला राजकीय व आर्थिक साक्षरता गरजेची असून त्यासाठी साहित्याची निर्मिती होणे आवश्यक असल्याचेही आमदार तांबे म्हणाले.
भीमाबाई जोंधळे यांचा विशेष सत्कार
हॉटेलच्या माध्यमातून वाचन चळवळ वृद्धिंगत करणाऱ्या आजी भीमाबाई जोंधळे यांचा सार्वजनिक वाचनालयातर्फे विशेष सत्कार करण्यात आला. आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देवून त्यांना गौरविण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.