four suspects arrested by police latest crime news esakal
नाशिक

जरीफबाबा खून प्रकरण : गोळी झाडणारा अद्याप फरारी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : निर्वासित अफगाणचे सुफी धर्मगुरू जरीफबाबा यांच्या खूनप्रकरणी (Murder) चौघांना अटक करण्यात आली असून, अद्यापही दोघे फरारी आहेत. जरीफबाबा यांचा खून संपत्तीच्या (Property reason) कारणातूनच झाला आहे.

बाबाने सहकाऱ्यांच्या नावावर केलेली संपत्ती कोट्यवधींची होती. जरीफबाबाला मुलगा झाल्यानंतर ही संपत्ती त्या मुलाच्या नावावर होईल, याच कारणातून बाबाचा खून झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान, हा खून बाबांचा जुना वाहनचालक व सहकाऱ्यांनी कट रचून बाबांवर गोळी झाडून खून केल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या चौघांना शुक्रवारी (ता. १५) न्यायालयात हजर केले जाणार असून, फरारी दोघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक मागावर आहे. (Zarif Baba murder case shooter is still not found nashik latest crime news)

गफार अहमद खान (रा. नगर), गणेश ऊर्फ देवा बाबासाहेब झिंजाड ऊर्फ पाटील (रा. लोणी, ता. राहाता, जि. अहमदनगर), रवींद्र चांगदेव तोरे (रा. शहाजापूर, कोळपेवाडी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर), पवन पोपट आहेर (रा. विठ्ठलनगर, येवला, जि. नाशिक) अशी अटक झालेल्या संशयितांची नावे आहेत.

ख्वाँजा सय्यद जरीफ अहमद चिश्ती ऊर्फ जरीफबाबा (वय २८) हे निर्वासित अफगाण सुफी धर्मगुरू पत्नी तरीना यांच्यासह वावी परिसरात तीन-चार वर्षांपासून वास्तव्याला होते. येवला शहर पोलिस ठाण्यात जरीफबाबा यांचा वाहनचालक अफजल अहमद कुर्बान खान (३४, रा. मिरगाव, सिन्नर) याच्या फिर्यादीनुसार, गेल्या मंगळवारी (ता. ५) जरीफबाबासह ते चारचाकी वाहनाने (एमएच ४३ बीयू ७८८६) वावीहून येवला येथे धार्मिक विधीसाठी गेले होते.

सायंकाळी त्यांचा जुना वाहनचालक रवींद्र तोरे याने चिचोंडी औद्योगिक वसाहत परिसरात जमिनीची पूजा करण्यासाठी त्यांना बोलावले होते. त्यावेळी पूजाविधी आटोपल्यानंतर संशयितांनी त्यांच्यावर गोळी झाडून खून केला होता. त्यानंतर संशयित बाबांचेच चारचाकी वाहन घेऊन पसार झाले होते.

संबंधित वाहन पोलिसांना दुसऱ्या दिवशी नगर जिल्ह्यात सापडले होते. त्यानंतर ग्रामीण पोलिसांची विविध पथके संशयितांच्या मागावर होती. पुणे, मुंबईमध्ये कसून शोध घेतल्यानंतर संशयित नवी मुंबईतील बदलापूरमध्ये असल्याची खबर मिळाली. त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी संशयितांना सापळा रचून अटक केली.

जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, येवल्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, सहायक निरीक्षक खंडागळे, नाना शिरोळे, हवालदार रवींद्र वानखेडे, जालिंदर खराटे, सुशांत मरकड, नवनाथ वाघमोडे आदी उपस्थित होते.

गफार, रवींद्र मुख्य सूत्रधार

संशयित रवींद्र तोरे हा जरीफबाबांच्या वाहनावरील जुना वाहनचालक होता. बाबांनी सुमारे तीन कोटींची मालमत्ता खरेदी केली होती. परंतु ते निर्वासित असल्याने त्यांना स्वत:च्या नावावर ती खरेदी करता येत नसल्याने त्यांनी नजीकच्या सहकाऱ्यांच्या नावावर ही मालमत्ता खरेदी केली होती.

दरम्यान, जरीफबाबा यांची पत्नी गरोदर असल्याने काही महिन्यांपासून ती वावी येथे राहावयास आली होती. बाबाला अपत्य झाले तर ते या प्रॉपर्टीचे मालक होऊ शकते. सहकाऱ्यांच्या नावावरील मालमत्ता बाबा त्या मुलाच्या नावावर करू शकतील, अशी या सहकाऱ्यांच्या मनात शंका आली असावी.

यातूनच मुख्य सूत्रधार गफार खान व रवींद्र तोरे यांनी बाबांच्या खुनाचा कट रचला. त्यासाठी त्यांनी पवन व गणेश यांच्यासह आणखी दोघांना कटात सहभागी करून घेतले. फरारी असलेल्या दोघांपैकी एकाने जरीफबाबांवर गोळी झाडल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके संशयितांच्या मागावर आहेत.

दुतावासामार्फत मृतदेह पाठविणार

जरीफबाबा यांचा मृतदेह घेण्यासाठी त्यांचे वडील अफगाणिस्तानातून येणार होते. घटना घडल्यानंतर विच्छेदन करून मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. नव्याने आलेल्या माहितीनुसार, दूतावासाच्या प्रक्रियेनंतर जरीफबाबांचा मृतदेह अफगाणिस्तानाला पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Whatsapp Call Recording : मिनिटांत रेकॉर्ड करा व्हॉट्सॲप कॉल, सोपी स्टेप वाचा एका क्लिकमध्ये..

Margashirsha Amavasya 2024: मार्गशीर्ष अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर करा गंगा स्नान, जाणून घ्या महत्व

SCROLL FOR NEXT