corona update  esakal
नाशिक

Corona Update News : नाशिक, मालेगावात आता कोरोनाचे शून्‍य सक्रिय रुग्‍ण

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे मेटाकुटीला आलेल्‍या नाशिककरांसाठी सध्या दिलासादायक परिस्‍थिती आहे. गेल्‍या काही दिवसांपासून नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या नगन्‍य राहात असल्‍याने सक्रिय रुग्‍णसंख्या एकवर आलेली आहे.

नाशिक शहर व मालेगाव महापालिका क्षेत्रात सध्या एकही सक्रिय रुग्‍ण नाही. नाशिक ग्रामीणमध्ये एका बाधितावर बुधवारी (ता. १८) उपचार सुरू होते. अशात नाशिकची वाटचाल कोरोनामुक्‍तीकडे आहे. (Zero active patients of Corona now in Nashik Malegaon Corona Update nashik News)

कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात करणाऱ्या रुग्‍णांच्‍या संख्येमुळे सक्रिय रुग्‍णांची संख्या घटत चालली होती. बऱ्याच दिवसांपासून जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या एकआकडी होती.

नुकताच नाशिक महापालिका क्षेत्र व मालेगाव महापालिका क्षेत्रातील सक्रिय कोरोना रुग्‍णसंख्या शून्‍यावर आली आहे. तर जिल्ह्यात उपचार घेत असलेला एकमेव कोरोनाबाधित हा नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहे.

आत्तापर्यंत जिल्ह्यात ३६ लाख २२ हजार ९८७ रुग्‍णांची चाचणी करण्यात आली होती. यामध्ये चार लाख ८२ हजार ४४९ बाधित आढळून आले होते.

यापैकी चार लाख ७३ हजार ५४४ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरित्‍या मात केली. तर आठ हजार ९०४ बाधितांचा कोरोनाने बळी घेतला होता. पूर्णपणे बरे झालेल्‍या रुग्‍णांची टक्‍केवारी ९८.१५ इतकी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT