zp  esakal
नाशिक

झेडपी शिक्षणाधिकारी लाच प्रकरण : तपास संशयाच्या भोवऱ्यात

विनोद बेदरकर

नाशिक : शिक्षण संस्थाचालकाकडून आठ लाखांची लाच स्वीकरणाऱ्या शिक्षकासह चालकास येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने (district court) दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे येथील पथकाने केलेल्या कारवाईतील प्रमुख संशयित माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

तपास संशयाच्या भोवऱ्यात

रात्री अटक न दाखविल्याने पसार झालेल्या शिक्षणाधिकारी झनकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याची चर्चा दिवसभर होती. एरवी गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देणाऱ्या ‘एसीबी’ने त्यांना रात्री घरी जाण्याची मुभा दिलीच कशी? दिली तर महिला पोलिस कर्मचारी का सोबत पाठविण्यात आला नाही, असा प्रश्न न्यायालय आवारात उपस्थित केला जात होता. तसेच नाशिक विभागाला भणकही लागू न देता ठाणे ‘एसीबी’ने केलेली ही कारवाईची चर्चा होती. त्यामुळे प्रमुख संशयित फरारी झालेल्या या प्रकरणात तपास संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले (चालक) व पंकज रमेश दशपुते (शिक्षक) अशी कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. मंजूर अनुदानानुसार शिक्षकांना नियमित वेतन सुरू करण्यासाठी लाच घेताना सापळा लावून पकडले. फरारी संशयित वैशाली वीर यांना रात्रीच चौकशीसाठी ताब्यात घेतले. सूर्यास्तानंतर महिला संशयिताला अटक करण्याबाबत न्यायालयाची काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्यामुळे बुधवारी (ता. ११) सकाळी हजर होण्याची ग्वाही घेत त्यांना घरी सोडले होते. मात्र त्यांनी सहकार्य न करता गुंगारा दिला, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

काय आहे प्रकार

रेवती शिक्षण संस्थेच्या नोव्हेंबर २०२० मध्ये २० टक्के अनुदान मंजूर झालेल्या चार शाळांतील ३२ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मंजूर अनुदानानुसार नियमित वेतन मिळण्यात शिक्षण विभागाकडून अडवणूक सुरू होती. त्रस्त संस्थाचालक व कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांच्याकडे पाच ते सहा महिन्यांपासून चकरा मारल्या. गेल्या महिन्यात संशयित वैशाली वीर-झनकर यांनी ३२ कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनापोटी नऊ लाख रुपयांची मागणी केली. संस्थाचालकांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्यानुसार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्र्यंबक रोड भागात सापळा लावला. त्यात वैशाली वीर-झनकर यांच्यासह यातील मध्यस्थी करणारा शिक्षक पंकज रमेश दशपुते (वय ३८), चालक ज्ञानेश्वर सूर्यभान येवले (४९, मेहरधाम, पेठ रोड) यांना आठ लाख रुपये घेताना पकडले. संशयित येवले यांनी दोघांना जिल्हा परिषदेच्या बाहेर घेऊन जात होली क्रॉस चर्च परिसरात लाचेची रक्कम स्वीकारली. दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने येवले यास लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले. भद्रकाली पोलिस ठाण्यात बुधवारी सकाळी गुन्हा दाखल झाला.

त्र्यंबक रोडवर नाट्य

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिघा संशयितांना ताब्यात घेतले. मात्र, सूर्यास्तानंतर संशयित महिला असल्यास अटक न करण्याबाबत न्यायालयाचे नियम आहेत. हे नियम लक्षात घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वैशाली वीर यांच्या दीराकडून ग्वाही घेत सकाळी हजर होण्याच्या अटीवर समन्स देत संशयित वीर यांना सोडून दिले. पण आज सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक दुपारपर्यत त्यांची वाट पाहत होते. दुपारी न्यायालयात संशयित हजर करण्याची वेळ होईपर्यंत त्या हजर न होत फरारी झाल्या, असे ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

तपास सुरू; इतरांना कोठडी

संशयित वैशाली वीर यांना रात्रीच चौकशीला ताब्यात घेतले. सूर्यास्तानंतर महिला संशयिताला अटक करण्याबाबत न्यायालयाची काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्यामुळे आज सकाळी हजर होण्याची ग्वाही घेत त्यांना घरी सोडले होते. मात्र त्यांनी सहकार्य न करता गुंगारा दिला. इतर दोघा संशयितांना दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. फरारी वैशाली वीर यांचा तपास सुरू आहे, असे ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपास अधिकारी पल्लवी ढगे-पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT