Summer Season : खारघर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल रमेश बैस यांच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने येथील दौऱ्यात जिल्हा परिषद अलर्ट झाली आहे.
पहिने येथील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी भेट, ग्रामपंचायतींची लायब्ररी येथे राज्यपाल भेट देणार असून भर दुपारी हा कार्यक्रम होणार असल्याने उष्माघाताचा धोका नको, यासाठी जिल्हा परिषदेकडून स्वतंत्र आरोग्य पथक, पाण्याची व्यवस्था तसेच कार्यक्रमास केवळ २४० निमंत्रितांना आमंत्रित केले आहे. (ZP alert after case of Kharghar Health team looking at risk of heat stroke summer nashik news)
राज्यपाल दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी पहिने येथे मंगळवारी (ता. २५) भेट देत पाहणी केली.
बुधवारी (ता.२६) रोजी राज्यपाल रमेश बैस हे जिल्हा दौऱ्यावर आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाकडे अधिकृत दौरा प्राप्त झाल्याने जिल्हा परिषदेमध्ये दौऱ्याची लगीनघाई सुरु झाली आहे. राज्यपाल बैस हे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर दर्शन घेऊन येथील पहिने गावात त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहे.
राज्यपाल हे पहिने गावातील अंगणवाडी केंद्र तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देणार आहेत. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत राज्यपाल बैस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार असून येथे जिल्हा परिषदेने साकारलेल्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांचे सादरीकरण होणार आहे.
यामध्ये युरीन टेस्ट कीट, पाच लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात हेल्थ कार्ड तसेच बॅक कर्ज पुरवठा लाभार्थ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वितरण केले जाणार आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
याच प्रांगणात बचत गटाच्या स्टॉल व वन विभागाच्यावतीने बांबूंपासून बनविलेल्या वस्तूचे प्रदर्शनाचे स्टॉलला ते भेट देणार आहेत. येथील ग्रामपंचायतींच्या लायब्ररीस देखील राज्यपाल भेट देऊन पाहणी करणार आहेत.
जिल्हा परिषदेने केलेली व्यवस्था
पावसाची शक्यता लक्षात घेऊन येथे खास वॉटरफ्रुफ मंडप टाकण्यात आला आहे. येथे चहूबाजूने फॅनची व्यवस्था करण्यात आली आहे. पाहुण्यांसाठी पाण्याची येथे व्यवस्था केली असून स्वतंत्र एक टॅंकर देखील येथे असणार आहे.
आरोग्य विभागाने स्वतंत्र पाच डॉक्टरांचे पथक नियुक्त केले आहे, ते सकाळपासून तेथे असणार आहे. याशिवाय रूग्णवाहिकेची देखील व्यवस्था केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.