Animal Husbandry Schemes  esakal
नाशिक

ZP Animal Husbandry Schemes: जि. प. पशुसंवर्धन विषयक योजनांना उद्यापर्यंत मुदतवाढ; या संकेतस्थळावर करा अर्ज

सकाळ वृत्तसेवा

ZP Animal Husbandry Schemes: जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग व राज्यशासन यांच्यामार्फत पशुपालकांना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण पशुपालकांसाठी शेळी गट व दुधाळ जनावर वाटप या योजना राबविल्या जात आहेत. (ZP animal husbandry schemes extended till tomorrow nashik News)

त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. त्याकरिता असलेली १५ डिसेंबरची मुदत वाढवून ही १८ डिसेंबर करण्यात आली आहे. त्यामुळे योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

अनुसूचित जातीसाठी १० +१ शेळीगट वाटप केले जाते त्यासाठी ७७ हजार ५६९ रुपये (७५ टक्के) अनुदान दिले जाते. तसेच २ दुधाळ जनावरांचा गट यात १ लाख १७ हजार ६३८ रुपये गायगटासाठी तर, १ लाख ३४ हजार, ४४३ रुपये म्हैसगटासाठी अनुदान आहे. अनुसूचित जमातीगटात १० +१ शेळीगट वाटप केले जाते त्यासाठी ७७ हजार ५६९ रुपये अनुदान दिले जाते.

सर्वसाधारण प्रवर्गात १०० एकदिवसीय कुक्कुट गट वाटपासाठी १४ हजार ७५० (५० टक्के) तर, २५ +३ तलंगा गट वाटपात ५ हजार ४२० रुपयांचे अनुदान दिले जाते. त्यासाठी ९ नोव्हेंबरपासून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत होते. त्यासाठी १५ डिसेंबर ही अंतिम मुदत होती.

परंतु जिल्हा स्तरीय योजना अंतर्गत खालील योजनांचे समाधानकारक अर्ज संख्या प्राप्त न झाल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्यस्तरीय योजनामध्येही १०+१ शेळीगट, दुधाळ जनावरांचा गट वाटप व १००० मांसल कुक्कुट पक्षीगृह बांधकाम या योजनांसाठी अर्ज करता येईल. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ https://ah.mahabms.com मोबाईल व्दारे अर्ज करण्यासाठी अॅप AH.MAHABMS तरी जिल्हयातील अनु जाती, अनु. जमाती व सर्वसाधारण पशुपालक यांनी खालील योजनांमध्ये अर्ज भरून योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन पशुसंवर्धन विभाग यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT