Nashik ZP News  esakal
नाशिक

Nashik ZP Bharti : 1 हजार 38 जागांसाठी विक्रमी 64 हजार अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP Bharti : राज्य सरकारच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षात मेगा भरतीची घोषणा करण्यात आली. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची भरती प्रक्रियेत जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात आले.

यात जिल्हा परिषदेतील रिक्त असलेल्या एक हजार ३८ जागांसाठी विक्रमी ६४ हजार ८० अर्ज प्राप्त झाले आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली. यातून तब्बल पाच कोटी ७५ लाख ४३ हजार १०० रुपयांचा शुल्क जमा झाले आहे. (zp bharti 64 thousand applications filed for 1 thousand 38 seats nashik news)

जिल्हा परिषदेच्या विविध २० संवर्गातील तब्बल एक हजार ३८ पदांची भरती प्रक्रिया पार पडणार असून, यासंदर्भातील जाहिरात ५ ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर २५ जुलैपर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपुष्टात आली असून, यात नाशिक जिल्हा परिषदेच्या एक हजार ३८ जागांसाठी तब्बल ६४ हजार ८० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

सदर परीक्षेची संपूर्ण भरती प्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या आय.बी.पी.एस. या कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सदर परीक्षा अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने होणार आहे. तथापि, काही समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून प्रलोभन दाखवून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशा फसवणुकीपासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी, तसेच अशा प्रकारच्या कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, अन्यथा अशी फसवणूक झाल्यास शासन अथवा जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही. अशा प्रकारे कोणतीही व्यक्ती परीक्षेसंदर्भात आर्थिक मागणी करीत असल्याबाबत निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध जवळच्या पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात यावी, असे सर्व आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्राप्त झालेले अर्ज

पदे जागा प्राप्त अर्ज

(कंत्राटी) ग्रामसेवक ५० ११,७२८

आरोग्य पर्यवेक्षक ३ ९१

आरोग्य परिचारिका

आरोग्यसेवक (महिला) ५९७ ३,९५४

आरोग्यसेवक (पुरुष) ४० टक्के ८५ १७,५७९

आरोग्यसेवक (पुरुष) ५० टक्के १२६ ६,४८८

औषध निर्माण अधिकारी २० ५,०५७

प्रयोगशाळा तंत्रज्ञ १४ २,६०७

विस्तार अधिकारी (सांख्यिकी) २ ३३७

विस्तार अधिकारी (शिक्षण) ७ १,०४७

वरिष्ठ सहाय्यक ३ १,७७३

पशुधन पर्यवेक्षक २८ ७७४

कनिष्ठ आरेखक २ ४१

कनिष्ठ लेखा अधिकारी १ ४८

कनिष्ठ सहाय्यक (लेखा) ५ ८६३

कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) २२ २,६६७

मुख्य सेविका / पर्यवेक्षिका ४ ६७७

कनिष्ठ यांत्रिकी १ ४४

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) इवद/ग्रा.पा पु. – ३४ ५,२६८

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

(स्थापत्य ) इवद/ग्रा.पा पु. ३३ २,९४२

लघुलेखक (उच्च श्रेणी) १ ९५

एकूण जागा १,०३८ ६४,०८०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Video: मनपाचा ट्रक पडला २५ फूट खड्ड्यात..! पुण्यातल्या सिटी पोस्ट परिसरातील विचित्र घटना

IND vs BAN 1st Test : Virat Kohli वर रोहित वैतागला; 'तो' एक निर्णय ज्याने अम्पायरही चकित झाले

Latest Marathi News Live Updates: नानासाहेब परुळेकरांच्या जयंतीनिमित्त नितीन गडकरींचं भाषण

IND vs BAN Test, 2nd Day: गोलंदाजांमुळे पहिल्या कसोटीत भारताने वर्चस्व गाजवले, पण Rohit - Virat च्या अपयशाने टेंशन वाढवले

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

SCROLL FOR NEXT