Child Marriage esakal
नाशिक

Child Marriage : बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा परिषदेची धडक मोहीम! महिला व बालकल्याण विभाग करणार कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Child Marriage : जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण विभाग सरसावला असून, विभागामार्फत धडक मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेंतंर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये पुढील काळात ग्राम बाल दक्षता समितीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.

बालविवाह होणार अथवा झालेले आढळल्यास प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. (ZP campaign to prevent child marriage! Women and Child Welfare Department will take action nashik news)

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अक्षय तृतीयेच्या मुहूर्त साधत मोठ्या प्रमाणावर विवाह केले जातात. यामध्ये बालविवाहाचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे अशा प्रकारचे बालविवाह रोखण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने धडक मोहीम राबवली जाणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी यासंबंधी महिला व बालकल्याण विभागाला निर्देश दिले असून त्याअनुषंगाने महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे यांनी गुरुवारी (ता.२०) सर्व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची बैठक घेऊन संपूर्ण जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी विशेष धडक मोहीम राबवण्याचा सूचना दिल्या.

प्रामुख्याने ग्रामीण भागात लहान वयात मुलामुलींची लग्न लावून दिली जातात, शासनाने विवाह योग्य वय हे मुलाचे २१ व मुलीचे १८ ठरून दिले आहे, तरीसुद्धा अनिष्ट रूढी परंपरांच्या विळख्यात व चुकीच्या धारणेतून ग्रामीण भागात बालविवाह केले जातात.

या बालविवाहांना प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने बालविवाह प्रतिबंधक कायदा केला असून बालविवाहास कारणीभूत ठरणाऱ्या सर्व व्यक्तींना शिक्षेची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे, साधारणतः ग्रामीण भागात वय वर्ष १४ वर्ष ते १७ वयोगटातील मुलींचे विवाह हे लावून दिले जातात.

अशा विवाहांना प्रतिबंध करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने धडक मोहीम हाती घेतील असून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये पुढील काळात ग्राम बाल दक्षता समितीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

दवंडीसह गावातील सरपंच, ग्रामसेवक, आशा व अंगणवाडी सेविका, यांच्या माध्यमातून बालविवाह रोखण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम देखील केले जाणार आहेत. या विशेष मोहिमेत पहिल्या टप्प्यात जनजागृती केली जाणार असून त्यानंतर बालविवाह होणार अथवा झालेले आढळल्यास प्रशासनाच्या वतीने कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

यासाठी महिला व बालविकास विभागाकडून जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग व पोलिस प्रशासनाची मदत देखील घेतली जाणार आहे. महिला व बालविकास विभागाकडून पुढील काळात १८ वर्षाखालील मुलींची नोंदणी केली जाणार असून गावात होणाऱ्या विवाहांचे देखील सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

"बालविवाह करणे आणि त्यास कारणीभूत ठरणे दोन्ही बाबी कायद्याने गुन्हा आहेत. आपल्या गावात बालविवाह होणार असल्याची कुठलीही माहिती मिळाल्यास १०९८ या क्रमांकावर संपर्क साधावा, माहिती कक्षाकडून माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येते."

- दीपक चाटे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, जि.प.

"जिल्हा परिषदेच्या वतीने बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे, तरी देखील ग्रामीण भागात बालविवाह झाल्याचे आढळल्यास प्रशासनाने सर्व यंत्रणांना सोबत घेऊन कठोर कारवाई करावी."

- आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त; अवघ्या 15 दिवसांत सोन्याच्या भावात मोठी घसरण, आज काय आहे भाव?

Dehradun Accident: देहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा तरुणांचा मृत्यू; काय आहे इनसाईड स्टोरी? पोलिसांकडे अद्याप तक्रार नाही

IND vs AUS: विराट कोहली जखमी? काल अचानक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटलमध्ये गेला अन्...

Latest Maharashtra News Updates : 'कटेंगे तो बटेंगे' हा देशाचा इतिहास- देवेंद्र फडणवीस

Sanjay Raut : भाजप एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीच काय विरोधी पक्ष नेता पण करणार नाही , संजय राऊत यांचा खोचक टोला

SCROLL FOR NEXT