Nashik ZP News  esakal
नाशिक

Nashik ZP News: जि. प. मुख्यालय इमारत दुरुस्तीचे कंत्राट रद्द : आशिमा मित्तल

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी बांधकाम विभागाकडून केल्या जात असलेल्या कामांची झाडाझडती घेण्यास सुरवात केली आहे.

चांदवड तालुक्यातील एका कामाच्या दर्जाची पाहणी केली असता अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम त्यांना आढळले. यामुळे त्यांनी त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले आहेत.

त्याचप्रमाणे जिल्हा परिषद मुख्यालयाची रंगरंगोटी व देखभाल करीत असलेल्या ठेकेदाराने मुदतीत काम न केल्याने सदर ठेकेदाराचे थेट कंत्राट रद्द करण्याचे आदेश श्रीमती मित्तल यांनी दिले. (ZP CEO Ashima Mittal Statement Contract for repair of HQ building cancelled nashik)

मुख्यालयातील इमारतीच्या डागडुजी आणि रंगरंगोटीसाठी ४७ लाखांचे कंत्राट सार्वजनिक बांधकाम विभाग एकच्या माध्यमातून देण्यात आले होते. निविदेनुसार तीन महिन्यांच्या आत इमारतीची डागडुजी आणि रंगरंगोटी पूर्ण करणे अपेक्षित होते.

मात्र, मुदतीत काम पूर्ण झालेले नाही. इमारतीला कुठला रंग द्यायचा, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. इमारतीची डागडुजीची कामे अद्यापही बाकी आहेत. गळतीची ठिकाणे निश्चित झालेली असतानाही, गळती रोखण्यासाठी आवश्यक कार्यवाही केलेली नाही.

शिक्षण विभागातील गळतीबाबतही आदेश देऊन कार्यवाही झाली नाही. गत १५ दिवसांत पावसामुळे रावसाहेब थोरात सभागृहाच्या व्हरांड्यातील स्लॅब गळायला लागला होता.

स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी इमारतीच्या जाळ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, जिन्याचे कठडे यांना रंग देण्यात आला. सामान्य प्रशासन विभागाकडून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाकडे जाणाऱ्या जिन्याला नुकतेच काळ्या रंगाचे चमकदार कडप्पे बसविण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र, याबाबत प्रशासनाशी चर्चा न करता, फरशीचे सॅम्पल न दाखविता जुन्या चांगल्या पायऱ्या तोडून नवीन काळ्या रंगाचे चमकदार कडप्पे बसविण्यात आले. या कडप्प्यांवरून पाय घसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

कामे वेळात करावीत, गळती रोखावी यासाठी कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनीही वेळोवेळी संबंधित ठेकेदारास सूचना केल्या. मात्र, ठेकेदारांकडून कार्यवाही होत नसल्याचे दिसून आले.

त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी संबंधित ठेकेदाराचे कंत्राट तत्काळ रद्द करण्याचे निर्देश बांधकाम विभागाला दिले आहेत. तसेच, पुढील कामासाठी नव्याने निविदा काढण्यात यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिला ट्वेन्टी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये दोन नवे संघ! मिळणार New Champion

Sakal Podcast: विधानसभेसाठी मतदार नोंदणीची मुदत ते विराट कोहलीचा भीमपराक्रम

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 ऑक्टोबर 2024

आजचे राशिभविष्य - 19 ऑक्टोबर 2024

Mumbai Local News: पुलाच्या कामासाठी पॉवर ब्लॉक; सीएसएमटी ते भायखळा, वडाळादरम्यानची लोकल वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT