Nashik ZP News  esakal
नाशिक

Nashik ZP News : जि. प. तील कर्मचारी-ठेकेदारातील वाद थेट उपमुख्यमंत्र्यांकडे

जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात वर्षोनुवर्ष टेबल सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केल्यानंतर टेबलांचा मोहापायी सुरू असलेला संघर्ष अगदीच टोकाला पोचला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात वर्षोनुवर्ष टेबल सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केल्यानंतर टेबलांचा मोहापायी सुरू असलेला संघर्ष अगदीच टोकाला पोचला आहे.

यातून ठेकेदार व आमदारांच्या स्वीयसहाय्यकांनी महिला कर्मचाऱ्यास दिलेल्या त्रासातून त्या कर्मचाऱ्याने थेट उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली आहे. (ZP Disputes between employees and contractors directly to Deputy Chief Minister nashik News )

महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेसाठी शासकीय कार्यालयात विशाखा समिती असते, शिवाय प्रशासनप्रमुखांसह अनेक महिला अधिकारी कार्यरत असताना संबंधित महिला कर्मचाऱ्यांवर मंत्र्यांकडे दाद मागण्याची नामुष्की ओढवल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागात वर्षोनुवर्ष एकाच टेबलावर ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची गत वर्षी बदली करण्यात आली.

मात्र, ठेकेदार व कर्मचाऱ्यांचे असलेले हितसंबंध बघता बदली होऊनही अनेक कर्मचाऱ्यांनी टेबल सोडला नसल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी बदली ठिकाणी हजर झाले खरे. मात्र, त्यांचे सारे लक्ष हे बांधकाम विभागातील त्या टेबलाकडे राहात असल्याचे अनेकदा दिसून आले.

यातूनच विभागात बदली होऊनही कर्मचाऱ्यांना कामकाज मिळत नव्हते. अखेर याची ओरड झाल्यावर संबंधित महिला कर्मचाऱ्यास टेबल मिळाला. टेबल मिळाल्यानंतर कामकाज सुरू झाले खरे; परंतु याच कामकाजातून एका आमदारांच्या स्वीयसहाय्यकासोबत वादंग झाले अन् कर्मचारी महिलेचा संघर्ष सुरू झाला.

हा वाद अगदी विकोपाला गेला. संबंधित स्वीयसहाय्यकाने थेट त्या टेबलावरील महिलेची बदलीसाठी पत्र दिले. त्यासोबत अनेक आमदारांच्या पत्राची जोडदेखील देण्यात आली. यात महिला कर्मचाऱ्यास काम येत नसल्याचा ठपका ठेवत बदलीची मागणी करत बदली झालेल्या कर्मचाऱ्यांकडे पदभार देण्याची मागणी झाल्याचे कळते. यावर, महिला कर्मचाऱ्याने स्थानिक पातळीवर दाद मागण्याचा प्रयत्न केला.

मात्र, हा प्रयत्न अयशस्वी झाला. अखेर महिला कर्मचाऱ्यांनी थेट उपमुख्यमंत्री यांच्याकडे याबाबत तक्रार केल्याचे बोलले जाते. या तक्रारींची उपमुख्यमंत्री यांनी गंभीर दखल घेत प्रशासनाला विचारणा केल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे. या प्रकारानंतर प्रशासनप्रमुख यांनी ठेकेदारांची बैठक घेत विचारणा केल्याचे समजते.

स्वीयसहाय्यकांचा वारंवार हस्तक्षेप

आमदारांच्या स्वीयसहाय्यकांचा जिल्हा परिषदेतील कामकाजातील हस्तक्षेप हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. संबंधित टेबल हा आमदार निधीच्या कामाचा असल्याकारणाने या टेबलावर आमदार स्वीयसहाय्यकांचा कायम राबता राहतो. यातूनच संबंधित कर्मचारी अन् सहाय्यकांमध्ये हितसंबंध तयार होतात.

यात अनकेदा वाद होतात. यापूर्वीही असे अनेकदा वादंग झालेले आहेत. प्रशासकीय राजवट असल्याने आमदारांचे स्वीयसहाय्यक यांचा जिल्हा परिषदेत वावर जास्त आहे. संबंधित आमदारांच्या स्वीयसहाय्यकांनी काही महिन्यांपूर्वीच असा वाद घातला होता. त्यामुळे अनेक महिन्यांपासून या प्रकरणाला वादाची किनार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT