Transfer esakal
नाशिक

ZP Employee Transfer: नियमित बदल्यांना खो; विनंती बदल्यांचा पाऊस? जिल्हा परिषद कर्मचारी वर्गात नाराजी

सकाळ वृत्तसेवा

ZP Employee Transfer : गत तीन वर्षांपासून प्रतिक्षा करत असलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचारी नियमित बदल्यांना आदिवासी व बिगर आदिवासींतील समतोल ढासळला जात असल्याचे सबब करत खो घातला जात असताना दुसरीकडे सरार्सपणे प्रशासनाकडून विनंती बदल्या सुरू आहेत.

वर्षभर आरोग्य, ग्रामपंचायतसह विविध विभागातील सोईच्या तसेच मर्जीतील कर्मचाऱ्यांच्या विनंती बदली प्रक्रीया राबविली जात असल्याचे समोर येत आहे. विनंती बदली प्रक्रीया राबविताना समतोल ढासळला जात नाही का? असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून उपस्थित होत आहे. (ZP Employee Transfer Discontent among Zilla Parishad employees nashik news)

तीन वर्षांपासून रखडलेल्या कर्मचारी बदल्यांना यंदा मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सामान्य प्रशासन विभागाने वेळापत्रक देखील जाहीर केले. एकीकडे वेळापत्रक जाहीर करत असताना दुसरीकडे मात्र, गतवर्षीप्रमाणेच आदिवासी व बिगर आदिवासींतील समतोलचे कारण पुढे केले जात आहे.

त्यामुळे बदली प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. राज्य शासनाने पत्र पाठवून बदली प्रक्रीया राबविण्याचे निर्देश दिल्याने बदल्या निश्चित मानले जात आहे. असे असतानाच जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीची प्रक्रीया शासनाने सुरू केली.

या भरतीसाठी जिल्ह्यातील पेसा अंतर्गत मंजूर जागा, रिक्त जागांचा आराखडा मागविला. ही माहिती तातडीने मागविल्याने प्रशासनाने लागलीच कर्मचारी बदली प्रक्रीया पुढे ढकलली. त्यामुळे नियमित बदली प्रक्रीया राबविण्याबाबत प्रशासनाची भूमिका नकारात्मक असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नियमित बदली प्रक्रीया राबविली जाऊ नये यासाठी प्रशासनाकडून पळवाटा शोधल्या जात असल्याचे बोलले जात आहे.

दुसऱ्याबाजूला मात्र, विनंती बदल्या केल्या जात आहे. दर महिन्याला साधारणः १० ते १२ विनंती बदल्या करत, ठराविक कर्मचाऱ्यांना सोईच्या ठिकाणी बसविले जात असल्याची जोरदार चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे. नियमित बदल्यांपेक्षा विनंती बदल्यांमध्ये अनेकांना रस असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: ''विनोद तावडे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्यावर हल्ला झालाय'' फडणवीस अखेर बोललेच

Vinod Tawde Video: ''हितेंद्र ठाकूर यांनी मला गाडीमध्ये सगळं सांगितलंय'' भाजप नेत्याने टीप दिल्याच्या आरोपावर तावडे स्पष्टच बोलले

यंदा 70 टक्क्यांहून अधिक होईल मतदान! 2014 मध्ये 10.49 लाख तर 2019 मध्ये 12.16 लाख मतदारांनी केले नाही मतदान; 5 वर्षांत सोलापुरात वाढले 4.14 लाख मतदार

Vinod Tawde: ''अप्पा मला वाचवा!'' विनोद तावडेंनी खरंच 'तो' मेसेज केला का?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT