ZP Employees Transfer : जिल्हा परिषदेतील कर्मचारी बदल्यांचा मार्ग खुला झाला मात्र, बदल्यांना आता जिल्हा परिषदेतील मेगा भरतीचे विघ्न आले आहे.
राज्य शासनाने जिल्हा परिषदेमधील रिक्त पदांची भरती करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या संभाव्य लेखी परीक्षेचे स्वरूप जाहीर केलेमात्र दुसरीकडे पेसा भागातील मंजूर पदे, भरलेली पदे व रिक्त जागांची सविस्तर माहिती तातडीने मागविली आहे.
ही माहिती प्राधान्याने द्यायची असल्याने कर्मचारी बदल्यांचे वेळापत्रकात बदल होऊन, बदल्या आठवडाभर पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. (ZP Employees Delays in transfers due to recruitment Also changes in transfer schedule nashik news)
जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासनाने गत आठवड्यात कर्मचारी बदल्यांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार येत्या १६ ते १९ मे दरम्यान ही बदली प्रक्रीया पार पडणार आहे.
वेळापत्रक जाहीर झालेले असले तरी, रिक्त जागांचे प्रमाण जास्त असल्याने आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रातील जागांचा समतोल साधला जात नसल्याने बदल्यांबाबत साशंकता व्यक्त केली जात होती.
बदल्यांसाठी यंदा कर्मचारी वर्ग आग्रही झाले असून आदिवासी तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे बदल्यांची मागणी केली होती. यातच, ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारींना पत्र काढत बदल्यांबाबत असलेल्या धोरणांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.
त्यामुळे प्रशासन बदली प्रक्रीया राबविण्याच्या तयारीला लागले. परंतु, यातच जिल्हा परिषदेतील रखडलेली भरती प्रक्रीया देखील सुरू झाली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
जिल्हा परिषदेमध्ये ऑगस्ट २०२३ पूर्वी तब्बल ७५ हजार जागांपैकी १८ हजार ९३९ जागा भरण्यासाठी शासन प्रयत्नशील असून या धर्तीवर लेखी परीक्षेचे स्वरूप शासनाने जाहीर केले आहे. स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर विचारणारे प्रश्न या परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे.
त्यासाठी संभाव्य लेखी परीक्षेचे स्वरूप जाहीर केले आहे. त्यामुळे शासनस्तरावर भरतीची तयारी सुरू झाली याचाच भाग म्हणून राज्य शासनाने जिल्हा परिषदेकडे आदिवासी भागातील एकूण मंजूर पदे, रिक्त पदे यांची आराखड्याप्रमाणे माहिती मागविली आहे.
ही माहिती गोळा करण्यासाठी किमान आठवडाभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने १६ मे पासून सुरू होणारी बदली प्रक्रीया २२ मे पासून सुरु होऊ शकते. याबाबतचे नवे वेळापत्रक तयार केले जाईल असे सांगण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.