ZP Nashik  esakal
नाशिक

Nashik ZP News : जि. प. प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचाही काढणार पदभार; प्रशासनाकडून प्रस्ताव दाखल

जिल्हा परिषदेतील प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची धुरा सांभाळत असलेले उपशिक्षणाधिकारी उदय देवरे यांच्याकडून अखेर पदभार काढून घेतला जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : जिल्हा परिषदेतील प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची धुरा सांभाळत असलेले उपशिक्षणाधिकारी उदय देवरे यांच्याकडून अखेर पदभार काढून घेतला जाणार आहे.

देवरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याने तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारीपदाचा खेळखंडोबा झाल्याच्या तक्रारी मुख्याध्यापक संघाच्या बैठकीत करण्यात आल्या. (zp In charge Secondary Education Officers will also be removed nashik news)

त्यावर शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी देवरेंवर गुन्हा दाखल झाल्याने त्यांचाही पदभार काढण्याचे निर्देश दिल्याचे कळते. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी पाठविला आहे.

महात्मा गांधी विद्यामंदिर, आदिवासी सेवा समिती संस्थेत शासकीय नियम डावलून ४० शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करीत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेचे विश्वस्त मंडळ यांसह माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांच्याविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

गुन्हा दाखल झाल्यावर त्यांचा माध्यमिकचा पदभार काढून घेत माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी उदय देवरे यांच्याकडे सोपविला होता. पदभार हा समकक्ष अधिकाऱ्यांकडे सोपविणे जाणे अभिप्रेत असताना शासन नियम डावलून तो देवरेंकडे सोपविल्याने पाटील यांनी आक्षेप घेतला. त्यावर, प्रशासनाने शासनाकडे मार्गदर्शन मागवत प्रशासनाच्या केलेल्या कार्यवाहीवर शिक्कामोर्तब करून घेतले.

यातच, नियमबाह्य शिक्षक भरती करून शासनाची फसवणूक करणाऱ्या सातपूर कॉलनीतील विविध विकास संघटना संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या संचालक मंडळासह तत्कालीन शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, शिक्षण उपसंचालक, अधीक्षक असलेल्या देवरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने पाटील यांच्याप्रमाणे त्यांचा पदभार प्रशासनाने काढला नाही. त्यावर ओरड झाली.

येवला येथे मुख्याध्यापक संघाची बैठक झाली. यात शिक्षण आयुक्त मांढरे उपस्थित होते. यावेळी बैठकीस पाटीलसह देवरेंही उपस्थित असल्याने संभ्रम निर्माण झाला. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षकांनी माध्यमिक विभागात सुरू असलेल्या अधिकार्यांच्या खेळाबाबत तक्रारी मांडल्या. देवरेंकडे पदभार असताना पाटीलही येऊन बसतात, पाटीलही काम करतात नक्की पदभार कोणाकडे आहे हे कळत नसल्याचे शिक्षकांनी सांगितले.

याचा परिणाम कामकाजावर झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.त्यावर, आयुक्त मांढरे यांनी लवकर सक्षम अधिकारी दिला जाईल, असे सांगितले. त्यानंतर आयुक्त मांढरे यांनी देवेरेंवर गुन्हा दाखल असल्याने पाटील यांच्याप्रमाणे त्यांचाही पदभार काढण्यात यावा, अशा सूचना केल्या.

या सूचनेनंतर सामान्य प्रशासन विभागाने देवेरेंकडून पदभार काढण्याबाबत प्रस्ताव तयार केला आहे. यात चार अधिकार्यांची नावे देण्यात आली असून त्यापैकी एकाकडे पदभार देण्यात यावा, असे सांगितल्याचे बोलले जात आहे.

''प्रभारी पदभार असलेल्या उदय देवरेंवर गुन्हा दाखल झालेला असल्याने पाटील यांच्याप्रमाणे त्यांचा पदभार काढण्याच्या सूचना प्राप्त झाल्या. त्यानुसार देवरेंचा पदभार काढण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे.''-रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT