Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष करंडक २०२३-२४ या स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पेठ पंचायत समितीने पटकावले. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धांचे सर्वसाधारण विजेतेपद दिंडोरी पंचायत समितीला प्रदान करण्यात आले.
नाशिक येथील (कै.) मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर जिल्हा परिषद अध्यक्ष करंडक स्पर्धा अंतर्गत दोनदिवसीय जिल्हास्तरीय कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा सुरू होत्या. (ZP President Karandak Peth Panchayat Samiti nashik news)
मंगळवारी (ता. ६) या स्पर्धेचा पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. आमदार नरेंद्र दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव, गटशिक्षणाधिकारी मीता चौधरी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड आदी उपस्थित होते.
पालकमंत्री भुसे म्हणाले, की जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये असलेले गुण पाहता भविष्यात जिल्हा परिषद शाळांचा दर्जा हा सर्वार्थाने वाढून जिल्हा परिषद शाळांमध्येही प्रवेशासाठी रांगा लागल्याशिवाय राहणार नाही. जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी सुपर ५०, आदर्श शाळा, मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा हे उपक्रम राबविले जात आहेत.
त्यामुळे जिल्हा परिषद शाळांचा दर्जाही उंचावतोय. ग्रामस्थही जिल्हा परिषद शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करीत असतानाचे चित्र नाशिक जिल्ह्यात दिसत आहे. प्राथमिक शिक्षणाबाबत नाशिक जिल्ह्याची कामगिरी कौतुकास्पद आहे. राज्यात अव्वल क्रमांक मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दोनदिवसीय स्पर्धांत सांस्कृतिक स्पर्धांमध्ये वक्तृत्व, चित्रकला, बुद्धिबळ, गीतगायन, समूह गीत, वैयक्तिक नृत्य, सामूहिक नृत्य व क्रीडा स्पर्धांमध्ये धावणे (मुले/मुली), खो-खो (मुले/मुली), कबड्डी (मुले/मुली) या स्पर्धा झाल्या. या स्पर्धांमध्ये पेठ तालुक्याने आपला दबदबा कायम ठेवत ९४ गुण मिळवत जिल्हा परिषद अध्यक्ष करंडकाचे मानकरी ठरले.
उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, धनंजय कोळी, नीलेश पाटोळे, अनिल दराडे यांच्यासह सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, शिक्षणविस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.