Teacher esakal
नाशिक

ZP School Teacher Payment: जि. प. च्या 6 हजारांवर शिक्षकांना 31 तारखेलाच वेतन

सकाळ वृत्तसेवा

ZP School Teacher Payment : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत सहा हजार शिक्षकांना एक तारखेपूर्वीच वेतन मिळाले आहे.

प्राथमिक शिक्षक विभागाच्या प्रयत्नांनी शिक्षण विभागाच्या दहा हजारांपैकी निम्म्याहून अधिक शिक्षकांचे वेतन गुरुवारी (ता. ३१) जमा झाले असून, निवृत्त शिक्षकांचे निवृत्तिवेतनही जमा झाले आहे.

त्यामुळे शिक्षण हमी कायद्याची अंमलबजावणी झाल्याचे दिसून आले. (ZP School Payment 6 thousand teachers on 31st nashik )

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याबाबत निश्चित तारीख नसल्याने वेळेत वेतन जमा होत नव्हते. वेळेवर वेतनपत्रके तयार होत नसल्याने कोशागारात निधी येऊनही वेतन मिळत नसे. महिन्याची १५ तारीख उजाडूनही शिक्षकांना वेतन मिळत नव्हते.

त्यामुळे वेळेत वेतन मिळावे, अशी मागणी सतत सुरू होती. शिक्षक संघटनांचा शासन दरबारी कायम पाठपुरावा सुरू होता. शिक्षण हमी कायद्यात वेतनाचा मुद्दा प्रामुख्याने नमूद करण्यात आला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी वेतन वेळेत जमा होण्याबाबत कार्यवाहीचे आदेश सामान्य प्रशासन विभागाला दिले. त्यानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन एक तारखेला जमा करण्यासाठी आवश्यक ती पूर्तता करण्याच्या सूचना विभागांना केल्या होत्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या सूचनेनुसार शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी तातडीने कार्यवाही सुरू केली. परिणामी ऑगस्टचे शिक्षकांचे वेतन १ तारखेपूर्वीच त्यांच्या खात्यात जमा झाले आहे. कार्यरत दहा हजार शिक्षकांपैकी सहा हजार शिक्षकांचे वेतन गुरुवारी उशिराने जमा झाले.

उर्वरित शिक्षकांचे वेतन शुक्रवारी (ता. १) जमा होणार आहे. याशिवाय, आठ हजारांहून अधिक असलेल्या निवृत्त शिक्षकांचे निवृत्तिवेतनही वेळेत जमा झाले. दर महिन्याला याप्रमाणेच वेळेत वेतन जमा होईल, असेही श्री. बच्छाव यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC मध्ये कोट्यवधींचा घोटाळा, RTIकडून खुलासा, ट्विट करत काँग्रेस नेत्याचे महायुतीवर टीकास्त्र

Shri Thanedar: ट्रम्प लाट असूनही मराठमोळ्या नेत्याने उधळला विजयाचा गुलाल! दुसऱ्यांदा बनले अमेरिकेचे खासदार, कोण आहेत श्री ठाणेदार ?

"तो सेटवर खूप..." अक्षय कुमारच्या सहकलाकाराचा खळबळजनक खुलासा ; "त्याच्या दोन-तीन गर्लफ्रेंड्स..."

USA Election 2024: राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल! सोशल मीडियावर मिम्सचाही पाऊस

Latest Marathi News Updates live: महाविकास आघाडीच्या सभेत जयस्तुते गाण्याच सादरीकरण

SCROLL FOR NEXT