transfers news esakal
नाशिक

ZP Staff Transfer : कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय अन विनंती बदल्या; प्रशासनाकडून बदल्यांची तयारी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा परिषद कर्मचारी बदली प्रक्रियेत गेल्या तीन वर्षांपासून समतोल राखण्याच्या नावाखाली बदल्या टाळल्या जात होत्या.

यंदाही समतोल राखायचा कसा यावरून प्रशासनासमोर पेच निर्माण झाला होता. (zp staff transfer Order 10 percent administrative and 10 percent request transfer in transfer process by state govt nashik news)

मात्र, यावर राज्य शासनाचेच तोडगा काढला असून, बदली प्रक्रियेत १० टक्के प्रशासकीय तर १० टक्के विनंती बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आदिवासी भागातील असमतोल दूर होऊन बदल्यांचा मार्ग खुला झाला आहे.

कोरोना संकटापासून रखडलेल्या कर्मचाऱ्यांना बदल्यांची प्रतीक्षा होती. त्यादृष्टीने सामान्य प्रशासन विभागाने वेळापत्रक देखील जाहीर केले. मात्र, गतवर्षीप्रमाणेच आदिवासी व बिगर आदिवासीतील समतोलचे कारण पुढे केले जात होते. राज्य शासनाने पत्र पाठवून बदली प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिल्याने बदल्या निश्चित मानले जात आहे.

असे असले तरी समतोल ढासळला जाणार असल्याची ओरड दुसऱ्या बाजूला सुरूच होती. याच गोंधळात गत आठवडयात जाहीर केलेले वेळापत्रक देखील पुढे ढकलण्यात आले. त्यामुळे बदल्यांबाबत संभ्रम निर्माण झाला. यावर सोमवारी झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत प्रशासनाने बदल्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी विभागप्रमुखांना बदली प्रक्रियेचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. बदल्यांबाबत असलेला संभ्रम दूर झाला असून राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा प्रशासनास गुरूवारी (ता.१८) पत्र देत, १५ मे २०२१४ च्या कर्मचारी बदली आदेशाप्रमाणे नमूद केलेल्या म्हणजे १० टक्के प्रशासकीय आणि विनंती बदल्या कराव्यात असे सांगितले आहे.

याशिवाय इतर संवर्गाप्रमाणेच ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांच्यादेखईल बदल्या करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी असे पत्रात म्हटले आहे. या पत्रामुळे बदल्या होणार हे अंतिम मानले जात आहे. यात आदिवासी व बिगर आदिवासी यात सारख्याच जागा रिक्त होऊन भरल्या जाणार आहे. येत्या २३ मे पासून बदली प्रक्रीया होणार असून त्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

बदल्यांना संघटना अनुकूल

जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेपाठोपाठ जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने देखील बदल्यांसाठी आग्रही भूमिका घेतली आहे. याबाबत युनियनचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार हळदे यांच्या नेतृत्वाखालील पदाधिका-यांनी उपमुख्यकार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांची भेट घेऊन कर्मचारी बदल्या कराव्यात अशी भूमिका मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत

Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस'! Champions Trophy 2025 साठी निवडला नवा प्रभारी कोच; जेसन गिलेस्पी आता फक्त...

Winter Kitchen Cleaning Tips: किचन हे आरोग्याचे अन् रोगाचे माहेरघर! हिवाळ्यात अशा प्रकारे स्वयंपाकघराची ठेवा स्वच्छता

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT