ZP Nashik latest marathi news esakal
नाशिक

Nashik ZP News : जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांची प्रशासनाकडून तयारी; सेवाज्येष्ठता यादीसाठी मागविली माहिती

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : कोरोना संकटामुळे गत दोन वर्षे, तर आदिवासी व बिगर आदिवासीतील अनुशेषामुळे गतवर्षी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊ शकलेल्या नाहीत. यंदा कर्मचारी बदल्या होणार की नाही, याबाबत संभ्रमावस्था असताना प्रशासनाने, कर्मचारी बदल्यांबाबत हालचाली सुरू केल्या आहेत.

काही ठराविक परिस्थितीत शासनाकडून बदल्यांबाबत मार्गदर्शन प्राप्त होते; अन्यथा मे २०१४ च्या शासन आदेशाप्रमाणे बदल्यांची कार्यवाही सुरू होते. याचप्रमाणे प्रशासनाने यंदा बदली प्रक्रियेची कार्यवाही सुरू केली आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यासाठी माहिती मागविली जात आहे. (ZP staff transfer preparation by administration Information sought for seniority list nashik news)

२०२० व २०२१ ही दोन वर्षे कोरोनाचे संकट असल्याने कर्मचारी बदली प्रक्रिया झाली नव्हती. २०२२ या आर्थिक वर्षात कोरोनाचे संकट कमी झाल्याने बदली प्रक्यारि होणार हे निश्चित मानले जात होते.

त्यादृष्टीने प्रशासनाने कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी तयार करत, सामान्य प्रशासनाने नियमाप्रमाणे बदली प्रक्रियेची कार्यवाही सुरू केली होती. त्यासाठी २३, २४ व २५ मेदरम्यान मुख्यालयातील तसेच २६ ते ३१ मेदरम्यान पंचायत समिती स्तरावरील बदली प्रक्रियेचे वेळापत्रक मान्यतेसाठी त्या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केले होते.

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना पत्र पाठवत १४ मे २०१४ च्या शासन आदेशाप्रमाणे कर्मचारी बदल्यांची कार्यवाही करावी, असे आदेश दिले. शासनाचे आदेश प्राप्त झाल्याने कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया होणार हे ठरले होते.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

मात्र, गतवर्षी आदिवासी व बिगरआदिवासी भागातील रिक्त पदांचा आढावा घेऊन बदली प्रक्रिया राबविल्यास समतोल ढासळला जाईल, असे सांगत प्रशासनाने बदली प्रक्रिया न करण्याची भूमिका त्या वेळी घेतली होती.

त्यामुळे बदली आदेश होऊनही बदली प्रक्रिया राबविण्यात आली नव्हती. यंदाही हा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, प्रशासनाने शासन आदेशाप्रमाणे बदली प्रक्रियेच्या कार्यवाहीस प्रारंभ केला आहे.

यात सर्व विभागांकडून सेवाज्येष्ठता यादीची माहिती मागविली जात आहे. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाकडून सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली जाईल, असे सांगितले जात आहे. बदल्यांबाबत हालचाली सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT