Savita Nana Pawra and Mochda Bhamta Pawra receiving the award from President Draupadi Murmu. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : याहामोगी माता बियाणे संवर्धन समितीला राष्ट्रीय पुरस्कार; राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : हरणखुरी (ता. धडगाव, जि. नंदुरबार) येथील याहामोगी माता बियाणे संवर्धन समितीला राष्ट्रीय वनस्पती जनुक संवर्धक समुदाय पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेमध्ये जागतिक अन्न व कृषी संस्था आणि भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत झालेल्या कृषी जैवविविधता आणि शेतकरी हक्क पहिल्या जागतिक परिषदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हा पुरस्कार वर्ष २०२०-२१ साठी प्रदान करण्यात आला. (National Award to Yaha Mogi Mata Seed Conservation Committee nandurbar news)

सविता नाना पावरा आणि मोचडा भामटा पावरा यांनी पुरस्कार स्वीकारला. दहा लाख रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ही समिती बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनअंतर्गत कार्यरत आहे.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्रसिंग तोमर, कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलास चौधरी, कृषी विभागाचे सचिव मनोज आहुजा, वनस्पती वाणांचे संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. त्रिलोचन मोहापात्रा, कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव डॉ. हिमांशू पाठक आदी उपस्थित होते. ‘प्लांट ॲथॉरिटी भवन’ पीपीव्हीएफआर प्राधिकरणाचे कार्यालय आणि ऑनलाइन वनस्पती विविधता ‘नोंदणी पोर्टल’चे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले.

बियाणे संवर्धन समितीचे कार्य

धडगाव तालुक्यात ‘बाएफ’ संस्थेमार्फत २०१० पासून सुरू असलेल्या स्थानिक जैवविविधता संवर्धन वृद्धी व प्रसार उपक्रमांतर्गत स्थापन झालेल्या याहामोगी माता बियाणे संवर्धन समितीमार्फत येथील जैवविविधता अबाधित राखून तिचे संवर्धन करण्यावर भर दिला जात आहे. लोकसहभागातून पिकांच्या स्थानिक वाणांचे संवर्धन, उत्पादन आणि प्रसाराचे काम सुरू झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या माध्यमातून मका, ज्वारी, भरडधान्य पिके, कडधान्यांच्या शंभराहून अधिक वाणांचे संवर्धन, अभ्यास आणि लागवड केली जाते. धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील १५ गावांमध्ये मका, ज्वारी, कडधान्ये, तेलबिया आणि भाजीपाला पिकांच्या १०८ स्थानिक पीक वाणांचे संवर्धन आणि बियाणे उत्पादन केले जाते.

हरणखुरी, चोंदवडे गावात दोन सामुहिक बियाणे बॅंकांमार्फत मका, ज्वारी आदी पिकांचे २५ टन बियाणे उत्पादन आणि १७० टन धान्य उत्पादन आणि विक्री करण्यात आली आहे. तसेच ज्वारीच्या जवळजवळ १९ जाती शोधून काढल्या आहेत. त्यांचे शुद्धीकरणाचे काम केले असून, यापैकी पाच जाती पीक वाण संवर्धन आणि शेतकरी हक्क प्राधिकरण, शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडे नोंदणीकृत करून घेण्यात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambegaon Shirur Assembly election : दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात उमेदवार कोण?

Latest Maharashtra News Updates : कोल्हापूरला परतीच्या पावसाने झोडपले

IND vs NZ 1st Test : नशीबानं थट्टा अशी मांडली...! Rohit Sharma ची विचित्र विकेट पडली, कॅप्टनलाही विश्वास बसेना

Diwali Dos and Don'ts: दिवाळीला कोणत्या गोष्टी कराव्या अन् कोणत्या नाही, वाचा एका क्लिकवर

Manini De : छोट्या पडद्यावर परतणार मानिनी डे; झी टीव्हीवरील मालिकेत साकारणार 'ही' महत्वाची भूमिका

SCROLL FOR NEXT