Nandurbar News : देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालयामार्फत १४५६७ क्रमांकाची राष्ट्रीय हेल्पलाईन/एल्डरलाईन सेवा सर्व राज्यात सुरु करण्यात आली आहे. (National helpline service number 14567 launched for senior citizens nandurbar news)
हेल्पलाईनची वेळ सकाळी ८ ते संध्याकाळी ८ पर्यंत असते. या टोल फ्री हेल्पलाईनच्या माध्यमातून निवृत्तिवेतन, ज्येष्ठ नागरिक योजना, कायदेशीर समस्या, बेघर आणि वृद्धांवरील अत्याचार इत्यादींची माहिती व मदत देण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यासाठी क्षेत्रीय अधिकारी राहुल पवार (९१७२७१८८७४) असा आहे.
हेल्पलाईनवर मिळणाऱ्या सेवा
ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याबाबत जागरूकता, निदान, उपचार, निवारा/वृद्धाश्रम, डे केअर सेंटर, पोषण विषयक, ज्येष्ठांसंबंधी अनुकूल उत्पादने, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कला, करमणूक आदीची माहिती दिली जाते. वैयक्तिक आणि कौटुंबिक दोन्ही स्तरावरील कायदे विषयक प्रकरणी, मालमत्ता, शेजारी आदी विवाद निराकरण, आर्थिक, निवृत्तिवेतन, शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन केले जाते.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
चिंता निराकरण, नातेसंबंध विषयक व्यवस्थापन, मृत्यूशी संबंधित शोक, वेळ, ताण, राग व्यवस्थापन; मृत्यूपूर्वीचे दस्तऐवजीकरण आदी विषयी जीवन व्यवस्थापनाबाबत भावनिक समर्थन दिले जाते. बेघर, अत्याचारग्रस्त वृद्ध, ज्येष्ठ व्यक्तींची सेवा व काळजी घेण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर मदत केली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.