Raid on gambling den latest marathi news esakal
उत्तर महाराष्ट्र

नवापूरला जुगार अड्ड्यावर छापा; 63 जण पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

नवापूर (जि. नंदुरबार) : तालुक्यातील बेडकीपाडा एमआयडीसीतील पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी ६३ जणांवर कारवाई करून ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

बेडकीपाडा शिवारात एमआयडीसीमधील एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती नाशिक विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या पथकाला मिळाली. नाशिक व नंदुरबार पोलिसांनी गुरुवारी (ता. १८) पहाटे अवैध जुगार अड्ड्यावर संयुक्त कारवाई केली. याबाबत नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Navapur raid on gambling den 63 people in police custody nandurbar crime latest Marathi news)

या कारवाईत ६३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, यात चार महिलांचा समावेश आहे. ३५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत गुजरात व महाराष्ट्र राज्यातील हायप्रोफाईल पुरुष व महिलांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.

सूरज अश्विन जयस्वाल यांच्या पत्र्यच्या बंदिस्त शेडमध्ये रईस रशीद शेख (वय ३२, रा. गडी परीसर नवापूर, मुळ मालक) व इतर ६३ असे बेकायदेशीर झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळताना आढळून आले. त्याच्याकडून ७ लाख ५३ हजार ४० रुपये रोख, चार ५२ पत्यांची कॅट, ५८ हजार रुपयांचे ९ मोबाइल, २७ लाख ५० हजार रुपयांच्या आठ चारचाकी वाहने, असा एकूण ३५ लाख ६१ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदारांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Byculla Assembly Election: भायखळ्यात कोण मारणार बाजी? दोन शिवसेनेत काटे की टक्कर!

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

SCROLL FOR NEXT