Netizens decided help families of dead and injured in accident dhule news sakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Accident News : चारणपाडा अपघाताने हळहळले समाजमन; समाज माध्यमांवर मदतीची दर्शविली तयारी!

सकाळ वृत्तसेवा

Dhule Accident News : चारणपाडा (ता. शिरपूर) येथे ४ जुलैला सकाळी घडलेला अपघात दहा जणांचे बळी घेऊन गेला आणि २८ जणांना जायबंदी करून गेला. मृत आणि जखमींची कुटुंबे या अपघाताने उद्‍ध्वस्त झाली. मात्र समाजमनावरही या अपघाताने मोठा ओरखडा ओढल्याचे दिसून आले.

समाज माध्यमांवर अपघाताच्या भीषणतेची चर्चा करून मृतांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या कुटुंबाप्रति समाजातून कोणती मदत करता येईल याबाबत गांभीर्याने विचारमंथन सुरू आहे. (Netizens decided help families of dead and injured in accident dhule news)

अपघातानंतर काही क्षणांतच त्याची छायाचित्रे, व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. अपघाताची भीषणता त्यातून दिसून आली. त्यानंतर विविध समाज माध्यमांवर अनेक पदाधिकाऱ्यानी मृतांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पोस्टवर कमेंट करताना नेटिझन्सद्वारे केवळ श्रद्धांजली वाहून थांबू नका, मृत आणि जखमींच्या कुटुंबाला कशी मदत करता येईल ते बघा असे सुनावले. त्यासोबतच काहींनी फंड रेझिंग करून अपघातग्रस्तांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत कशी करता येईल त्याबाबत मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली.

अपघाताच्या काही तासांनंतर मदतीबाबत विविध सोशल प्लॅटफॉर्मवर मतप्रवाह सुरू झाले. त्यात कोणी अपघातग्रस्तांच्या कुटुंबातील मुला-मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यास तयार असल्याचे सांगितले, तर कोणी त्यांना थेट आर्थिक मदत देण्याची तयारी दर्शविली. प्रशासनातर्फे मृतांच्या कुटुंबासाठी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली.

मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता पाच लाखांची रक्कम त्यांच्या भविष्यासाठी पुरेशी ठरेल का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शासन, स्वयंसेवी संस्था आणि समाज यांच्या समन्वयातून मृत व जखमींच्या कुटुंबातील मुला-मुलींचे भविष्य घडविणे योग्य ठरेल, अशी व्यवहारी मतेही नोंदविली गेली. विशेष म्हणजे केवळ स्थानिकच नव्हे तर अगदी थेट परदेशातूनही मदतीची तयारी दर्शवणाऱ्या पोस्टचा ओघ सुरू आहे.

जगण्याचा बराचसा भाग तंत्रज्ञानाने आभासी बनविल्याचा आरोप नेहमीच केला जातो. पण भारतीय समाजमन अद्याप कोरडे झालेले नाही. माणुसकीचा ओलावा तग धरून आहे हेच समाज माध्यमांवरील प्रतिक्रियांद्वारे स्पष्ट झाले.

चारणपाडा, कोळसापाणी, आंबापाणी या गावांची नावेही ज्यांनी ऐकलेली नसावीत, मृत आणि जखमींचा ज्यांच्याशी दुरान्वयानेही संबंध नव्हता, त्या दूरवरच्या अनोळखी लोकांनी केवळ मानवतेच्या धाग्यात स्वत:ला बांधून घेऊन मदतीची तयारी दर्शवावी ही बाब सर्वांना सुखावणारी आहे. अशा पद्धतीने आपण एकमेकांना जोडून घेऊ शकलो, तर बरीचशी दु:खे हलकी होतील, जगणे सुसह्य तर नक्कीच होईल हे यानिमित्ताने दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT