shindkheda Railway station building.  
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: शिंदखेडा रेल्वेस्थानकावर सुविधांची वानवा; प्रवासी संघटनेने लक्ष वेधावे

सकाळ वृत्तसेवा

Dhule News: केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयातर्फे शिंदखेडा रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा बदलला. या स्थानकावर लांब पल्ल्यांच्या गाड्यांना थांबा मिळाल्यामुळे रेल्वे प्रवाशांची सोय झाली. प्रवाशांच्या सेवेत असलेल्या या रेल्वेस्थानकावर मात्र अद्यापही काही उणिवा असून, त्या पूर्ण व्हाव्यात, अशी अपेक्षा प्रवाशांची आहे.

रेल्वेस्थानकावर असलेल्या अनेक उणिवांमुळे प्रवाशांना काही वेळेला त्रासही सहन करावा लागतो. रेल्वेचे अधिकारी मात्र या उणिवांबाबत अनभिज्ञ आहेत. प्रवासी संघटनेने या उणिवांकडे रेल्वे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधावे, अशी अपेक्षा आहे.

शिंदखेडा शहरापासून तीन किलोमीटरवर रेल्वेस्थानक आहे. तालुक्यातील जवळपास ५० पेक्षा अधिक गावांमधील नागरिक शिंदखेडा रेल्वेस्थानकावरून प्रवास करतात. (not facilities at Sindkheda railway station dhule news)

२०१७ नंतर शिंदखेडा रेल्वेस्थानकाचा चेहरामोहरा बदलला. शिंदखेडा रेल्वेस्थानक अद्ययावत करण्यात आले. तालुक्यातील नागरिकांच्या मागणीवरून या रेल्वेस्थानकावर नऊ जलद गाड्यांना थांबा देण्यात आला. यात मुख्यतः हावडा एक्स्प्रेस, खानदेश एक्स्प्रेस, ताप्तीगंगा एक्स्प्रेस, अमरावती एक्स्प्रेस, सुरत सुपरफास्ट अशा गाड्यांचा समावेश आहे. रेल्वेस्थानक अद्ययावत झाले, लांबपल्ल्यांच्या गाड्यांना थांबादेखील मिळाला परंतु अद्यापही काही समस्या शिंदखेडा रेल्वेस्थानकावर आहेत.

विश्रांती खोल्या बंद

शिंदखेडा रेल्वेस्थानकावर लांबून येणाऱ्या प्रवाशांसाठी विश्रांती खोल्या बांधण्यात आल्या आहेत. मात्र या खोल्यांना नेहमीच कुलूप लावून बंद ठेवण्यात येते किंवा या खोल्यांचा वापर अधिकाधिक रेल्वे कर्मचाऱ्यांकडूनच होताना दिसतो. विश्रांती खोल्या प्रवाशांसाठी आहेत. त्याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा याबाबतची कोणतीही माहिती रेल्वे विभागाचे अधिकारी प्रवाशांना देत नाहीत. त्यामुळे प्रवासी याबाबत अनभिज्ञ असतात.

पावसाळा, उन्हाळा, हिवाळा अशा कोणत्याही ऋतूमध्ये प्रवाशांना मात्र रेल्वे फलटावरच आपली वेळ घालवून वाट पाहावी लागते. त्यामुळे विश्रांती खोल्यांचा कोणताही उपयोग प्रवाशांना होत नसून या खोल्या म्हणजे शोभेची वस्तू आहे अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

रिझर्व्हेशन कोच पोझिशनची माहिती नाही

शिंदखेडा रेल्वेस्थानकावर अनेक जलद रेल्वेगाड्यांना थांबा आहे. या रेल्वे गाड्यांनी रिझर्व्हेशन करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्यादेखील अधिक आहे. रिझर्व्हेन कोच पोझिशन रेल्वेस्थानकावर असलेल्या कार्यालयाच्या जवळ असलेल्या फलकावर नमूद केलेली असते; परंतु अनेक प्रवाशांना फलकावर लिहिलेली रिझर्व्हेशन कोच पोझिशन समजत नाही.

त्यामुळे रिझर्व्हेशन कोच पोझिशनची माहिती रेल्वे विभागाने ध्वनिक्षेपकाद्वारे प्रवाशांपर्यंत पोचवावी, तसेच दोन्ही फलाटांवर डबा क्रमांकाचे फलक लावावेत त्यामुळे रेल्वेस्थानकावर गाडी आल्यानंतर प्रवाशांची होणारी धावपळ कमी होईल.

शौचालय बंद

रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी शौचालये तयार करण्यात आली आहेत; परंतु ही शौचालये शोभेची झाली आहेत. फलाटावर असलेल्या प्रवाशांनादेखील या शौचालयांचा वापर करता येत नाही. त्यासाठी आडोशाला जावे लागते. रेल्वेस्थानकावर प्रवासी गाडी असतानादेखील शौचालये बंदच असतात. त्यामुळे रेल्वे विभागाने फलाटावर तयार केलेली शौचालये असून नसल्यासारखीच आहेत.

अपूर्ण लाइट व्यवस्था

शिंदखेडा रेल्वेस्थानकाच्या फलाटावर करण्यात आलेली लाइट व्यवस्थादेखील अपूर्ण आहे. फलाटाच्या काही भागांमध्ये प्रवाशांना रात्री अंधारात उभे राहावे लागते. अंधारामुळे रात्री प्रवाशांना रिझर्वेशन बोगीवरील नंबर शोधण्यातदेखील अडचण होते. त्यामुळे अंधार असलेल्या भागांमध्ये लाइट व्यवस्था करण्याची मागणी प्रवाशांची आहे.

रेल्वे कनेक्शन बसची व्यवस्था नाही

शिंदखेडा रेल्वेस्थानकावर सुरतेकडून अथवा भुसावळकडून येणाऱ्या प्रवाशांना शिंदखेडा शहरात येण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या रेल्वे कनेक्शन बसची व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. अनेक वेळा प्रवाशांना बस नसल्यामुळे रेल्वेस्थानकावरून शिंदखेडा शहराकडे तीन किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो. त्यामुळे किमान रात्री आणि पहाटे असणाऱ्या रेल्वेगाड्यांना कनेक्शन बसेसची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही

शिंदखेडा रेल्वेस्थानकावरून अनेक प्रवासी प्रवास करतात; परंतु या प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. या स्थानकावर दोन फलाट असून, फलाट क्रमांक एकवरच २०० लिटरची पाण्याची टाकी बसविण्यात आली आहे. त्याच फलाटावर विशिष्ट अंतरावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नळ बसवून करण्यात आली आहे. या नळाद्वारे येणारे पाणीदेखील गरम असते. त्यामुळे प्रवासी या गरम पाण्याचा वापर पिण्यासाठी करू शकत नाहीत.

यापूर्वी फलाट क्रमांक एकवर शुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले होते व शुद्ध पाणी प्रवाशांना पिण्यासाठी उपलब्ध होत होते, मात्र सद्यःस्थितीत शुद्धीकरण यंत्र गायब झाल्याचे चित्र आहे. फलाट क्रमांक दोनवर सुरतेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी संपूर्ण प्लॅटफॉर्मवर कुठेही पाण्याची व्यवस्था आढळून येत नाही. पर्यायाने या फलाटावर असणाऱ्या प्रवाशांची पाण्याबाबत गैरसोय होताना दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है' राहुल गांधींनी उघडली तिजोरी अन् निघाला अदानी-मोदींचा फोटो, Video Viral

Latest Maharashtra News Updates : नाशिकमधील रेडीसन ब्लू हॉटेलवर निवडणूक आयोगाची कारवाई

ऋषभ पंतसारखाच आणखी एका क्रिकेटपटूचा भीषण अपघात; गाडीचा झालाय चुराडा...

भावासाठी उदयनराजे मैदानात! 'झुकेगा नही साला' म्हणत, कॉलर उडवत शिवेंद्रराजेंना मताधिक्‍याने विजयी करण्याचं केलं आवाहन

Nawab Malik : मतदानाच्या एक दिवस आधीच नवाब मलिक यांचे 'एक्स' अकाऊंट हॅक

SCROLL FOR NEXT