Modak prepared for Zilla Parishad school students. 
उत्तर महाराष्ट्र

Ganeshotsav Special : गणेशोत्सवात विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक मोदक..! कलसाडी येथे शिक्षिकेच्या उपक्रमाचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा

Ganeshotsav Special : कलसाडी (ता. शहादा) येथील जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत शाळेत गणेशोत्सवाचे औचित्य साधून पूरक आहारामध्ये पौष्टिक मोदक बनवून विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आलेल्या स्वादिष्ट मोदकांचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त खाऊन आस्वाद घेतला. या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

सध्या गणेशोत्सवात सर्वत्र गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. या काळात आपण जसे घरी विविध प्रकारचे मोदक बनवतो तसेच आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनासुद्धा स्वतः मोदक बनवून खाऊ घालावेत, असा विचार कलसाडी (ता. शहादा) येथील जिल्हा परिषद शाळेतील उपशिक्षिका स्नेहल सर्जेराव गुगळे यांच्या मनात आला. (nutritious modak was prepared and distributed to students by zp teacher nandurbar news)

त्यानुसार त्यांनी आपल्या घरी मुलगी ऋतुजा व मुलगा साई यांच्या मदतीने शाळेतील सर्व ११८ विद्यार्थ्यांसाठी मोदक बनविले. दरम्यान, साखर, विलायची, खसखस, रवा व ओले खोबरे घालून बनविलेल्या सारणाचे मोदक खाण्याचे अनेक फायदे आहेत.

मोदकामध्ये स्निग्धता आहे तसेच त्यातील सारणात जे पदार्थ वापरलेले आहेत त्याने स्मरणशक्ती व रोगप्रतिकारकशक्तीही वाढते. त्याचा पूरक आहार म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना उपयोग होईल हा हेतू समोर ठेवून मोदक बनविताना स्वच्छता व उत्कृष्टतेची सर्वतोपरी काळजी घेत स्नेहल गुगळे यांनी शिक्षिकांकडून मोठ्या प्रमाणात शाळेतच मोदक बनविले.

दरम्यान, सर्व शाळांमध्ये मुलांना मध्यान्ह भोजन सुरू आहे. मुलांना अधिकाधिक पौष्टिक आहार मिळून ते निरोगी व सशक्त राहावेत या उद्देशाने पोषण आहारासोबतच आठवड्यातून एक दिवस पूरक आहार देण्यात येतो. त्याला अनुसरून कलसाडी (ता. शहादा) येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये दैनंदिन शालेय पोषण आहारासोबत पूरक आहार म्हणून सर्व विद्यार्थ्यांना स्वादिष्ट मोदकांचे वाटप करण्यात आले.

मोदक वितरित करण्यासाठी कलसाडी शाळेचे पदोन्नती मुख्याध्यापक भिला ओंकार निळे, सहशिक्षक सुरेशचंद्र कलंकार, शिक्षिका रक्षादेवी गांगुर्डे, स्वाती सोनवणे आणि शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या दुर्गा कोळी, सोनीताईंचे सहकार्य लाभले.

महिलांना पाककृतीचे मार्गदर्शन

शिक्षिका स्नेहल गुगळे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोदक तर बनविले, त्याचसोबत गावातील अंगणवाडीसेविका, मदतनीस यांना सोबत घेऊन अंगणवाडीतील लाभार्थी विद्यार्थ्यांच्या मातांना सारणाचे मोदक कसे बनविले जातात, त्यात वापरण्यात येणारे पदार्थ, त्यांचे प्रमाण आणि बालकांना त्याचा आहारात होणारा उपयोग याबद्दलची सविस्तर माहिती त्यांनी उपस्थित महिलांनी दिली. तसेच सारणाचे मोदक बनविण्याची माहिती गावातील महिलांनासुद्धा दिली.

"जिल्हा परिषद शाळेत एवढ्या मोठ्या प्रमाणात सारणाचे मोदक बनवून ते विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्याची बाब पाहण्यात किंवा कुठेही वाचण्यात आली नाही. मात्र शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चाने पोषक असे मोदक येथील शाळेतील शिक्षक भगिनीने दिले ही आमच्या गावासाठी अभिमानाची बाब आहे. गरीब विद्यार्थ्यांसाठी लोकसहभागातून केलेले असे नावीन्यपूर्ण उपक्रम इतरांनाही प्रेरणादायी करू शकता." -राजू भिल, सरपंच, कलसाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

Sakal Podcast: युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची अमेरिकेनं दिली परवानगी ते बाबा सिद्दीकी हत्येतील मास्टरमाईंडला अटक

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

Marathwada: जातीयवाद , प्रांतवाद सोडून द्या अन हिंदूत्वासाठी एकत्र या; कालीचरण महाराजांचे आवाहन...

Mumbai Election: मुंबईत मतदारांची संख्या किती? आकडा वाचुन तुम्हालाही बसेल धक्का

SCROLL FOR NEXT