Medicine esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : 6 लाख 60 हजार मुलांना जंतनाशक गोळ्या; 13 फेब्रुवारीला राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम

जिल्ह्यात १३ फेब्रुवारी २०२४ ला राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त मोहीम राबविण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : जिल्ह्यात १३ फेब्रुवारी २०२४ ला राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचे आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला जंतनाशकाची गोळी देऊन मोहीम प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्या. मोहिमेत जिल्ह्यात १ ते १९ वर्षे वयोगटातील सहा लाख ६० हजार २१४ मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जिल्हा कार्यबल समितीची बैठक झाली. (on 13 February 2024 campaign conducted in district by giving deworming pills to children dhule news)

जिल्हाधिकारी गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगावकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंतराव भदाणे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सचिन बोडके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सोनिया बागडे, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. तरन्नुम पटेल.

साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. मोरे, जिल्हा हिवताप अधिकारी अ. रा. पाटील, मनपा आरोग्याधिकारी डॉ. एम. आर. शेख यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, की मोहिमेसाठी शिक्षण, महिला व बालविकास विभाग, आदिवासी विकास विभागाकडून लाभार्थी निश्चित करून ॲल्बेडॅझोल गोळ्यांचे वितरण करावे.

जंतनाशक गोळ्या सर्व शासकीय, शासकीय अनुदानित शाळा, आश्रमशाळा व खासगी अनुदानित व अंगणवाडी केंद्रांना पोचतील याची खात्री करावी.

शालेय पटावर तसेच अंगणवाडी पटावर नसलेल्या लाभार्थ्यांना जंतनाशक दिन अथवा मॉप अप दिन जंतनाशक गोळी देण्याकरिता सर्व शाळाबाह्य मुले-मुलींची यादी करून त्यांना जंतनाशक गोळी देण्यास आशा वर्करमार्फत अंगणवाडी केंद्रात आणावे. जंतनाशक गोळ्यांबाबत शिक्षकांना, अंगणवाडीसेविका, मदतनीस, आशासेविकांना माहिती द्यावी.

शाळा-अंगणवाडीत व्यवस्था

जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. बोडके म्हणाले, की १३ फेब्रुवारीला जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील एक हजार ८९२ शाळा, दोन हजार २०९ अंगणवाड्या तसेच शासकीय व खासगी शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व अंगणवाडी व शाळाबाह्य मुला-मुलींना समुदायस्तरावर जंतनाशक गोळ्या दिल्या जातील.

यासाठी ग्रामीण भागात एक हजार ४६५ व शहरी भागात १५० आशासेविका, ४०३ आरोग्य कर्मचारी, २० जिल्हास्तरीय पर्यवेक्षक, १०९ वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक केली आहे. गैरहजर, आजारपण अथवा इतर काही कारणास्तव गोळ्या घेऊ शकले नाहीत अशा मुला-मुलींसाठी २० फेब्रुवारी २०२४ ला मॉपअपदिनी अंगणवाडी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व घरोघरी जाऊन गोळ्या देण्यात येतील.

कोणतेही दुष्परिणाम नाहीत

लहान मुलांनी जंतनाशक औषधी घेतल्याने त्यांच्यातील रक्तक्षयाचा आजार कमी होऊन आरोग्यात सुधारणा होते. तसेच बालकांचा शारीरिक व मानसिक विकास होऊन अन्य संसर्गांची प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. या औषधांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

त्यामुळे १ ते १९ वयोगटातील सर्व मुलांनी जंतनाशकाची गोळी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गोयल, सीईओ गुप्ता, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देगावकर, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. बोडके यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT