Ashok Singh climbing the main electricity supply pole of the railway and the disaster department team trying to get him down esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : रेल्वेच्या खांबावर चढून एकाचा ठिय्या; मनोरुग्ण असल्याचा प्रशासनाचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : गोरखपूर ते सुरत प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने येथील रेल्वेस्थानकावर रेल्वे येताच तिच्यातून उतरून थेट रेल्वे विद्युत करणाऱ्या मुख्य वाहिनीच्या खांबावर चढून ठिय्या मांडला. दरम्यान, कोणाच्या तरी लक्षात ही बाब येताच त्यांनी रेल्वे प्रशासनास सांगितले.

वीजपुरवठा त्वरित बंद करून रेल्वे प्रशासन व पोलिसांनी त्याची समजूत काढत खाली उतरविले. या घटनेमुळे सुमारे एक तास रेल्वेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.(one person Climbed on railway pole and got sit nandurbar news)

त्यामुळे गोरखपूर- सुरत रेल्वे एक तास नंदुरबार रेल्वेस्थानकावरच थांबली होती. या घटनेने रेल्वे प्रशासनाची एकच धावपळ उडाली. मात्र संबंधितास उतरविण्यास यश आले. त्याची मानसिक स्थिती खराब असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

मंगळवारी (ता. २८) सकाळी अकराच्या सुमारास गोरखपूरकडून सुरतकडे जाणारी रेल्वेगाडी आली. गाडी रेल्वेस्थानकावर थांबताच तिच्यातून एक प्रवासी उतरला. अंगावर मळके कपडे, गळ्यात तुळशीमाळा, काहीसा साधू महाराजासारखा वाटणारा सुमारे ३५ वर्षांचा तरुण असावा. त्याने रेल्वेतून उतरताच थेट कोणताही विचार न करता रेल्वेच्या जिन्यावर चढावे असे रेल्वेस्थानकावर असलेल्या वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनाच्या खांबावर चढला.

रेल्वे पट्ट्याच्या मधोमध त्याने ठिय्या मांडला. या वेळी कोणाची तरी नजर त्याच्यावर गेली. प्रवासी आरडाओरड करायला लागले. रेल्वे प्रशासनाचा लक्षात ही बाब आणून दिली. त्यामुळे रेल्वे पोलिस, रेल्वे प्रशासनाची एकच धावपळ उडाली. प्रवासी, पोलिस, रेल्वेचे अधिकारी त्याला खाली उतरण्यासाठी आरोळ्या मारत होते.

मात्र त्याने दाद दिली नाही. कोणीतरी आत्महत्या करण्यासाठी तेथे चढले, असा अंदाज वर्तविला जात होता. शेवटी रेल्वे प्रशासनाने तत्काळ सूत्रे बोलवून रेल्वेचा वीजप्रवाह बंद केला. रेल्वे व्हॅन व संबंधित बचावकार्य करणारे कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी त्याला विनंती केली. मात्र तो उतरण्यास तयार नव्हता. तो घाबरलेला होता.

कशीबशी भीती काढत रेल्वेपथकाने त्याला खाली उतरविले. हा प्रकार साधरण एक ते दीड तास सुरू होता. त्यामुळे एक प्रवासी रेल्वेही थांबली होती. त्याला उतरविल्यावर पोलिसांनी ताब्यात घेतले. पुन्हा वीजपुरवठा सुरळीत करीत रेल्वे रवाना करण्यात आली.

तो मनोरुग्ण की भयभीत प्रवासी?

दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेताच त्याला पाणी, चहा, कोल्ड्रिंक्स, नाश्ता देत शांत केले. मात्र तो काहीही बोलण्यास तयार नव्हता. शेवटी त्याने नाव सांगितले. त्याने गोरखपूर येथील असल्याचे सांगितले. मोबाईल क्रमांक तोंडपाठ सांगितला. त्याच्या बोलण्यावरून तो शिक्षित होता. त्याने रेल्वे प्रशासनास दिलेल्या माहितीनुसार तो गोरखपूर येथील रहिवासी असून, त्याचे नाव अशोक काशीनाथ सिंग असे आहे.

सुरत येथे सेंट्रिंग काम करण्यासाठी मित्रासोबत तो जात होता. त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याचे प्रशासनाने सांगितले. त्याला वरिष्ठांच्या सल्ल्याने रुग्णालयात की त्याच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करावे हे ठरविणार असल्याचे सांगितले.

साहब बचा लो, मैं बालबच्चे वाला हूँ..!

दरम्यान, पत्रकारांनी त्याला बसवून ठेवलेल्या खोलीत जाऊन त्याच्याशी संवाद साधला. त्या वेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना माहिती विचारताना मानसिक स्थिती खराब असल्याने सांगताच तो म्हणाला, ‘नहीं साहब, मैं बताता हूँ, मैं दोस्त के साथ आ रहा था, मैं सो गया, उसका मोबाईल एकजन चुरा रहा था, मैने उसको बोला.

उसने मुझे पकडा और मुझकोही उसके पासके मोबाईल सामने रखकर बोला तुने ये चुराये है। मुझे साथ में पकडते घुमा रहा था, मैने चोरी नहीं किया, मैं बालबच्चे वाला हूँ साहब, मुझे बचा लो, जाडा जैसा ओ आदमी मुझे मारने के लिए ढूंड रहा।’ मात्र रेल्वे प्रशासनाने तो चुकीचे बोलत असल्याचे सांगून तो मनोरुग्ण असल्याचे म्हणत त्याला पत्रकारांजवळून इतरत्र हलविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT