crop loan sakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crop Loan : राष्ट्रीयीकृत बँकांचे २० टक्केच पीककर्जवाटप; पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांचे सपशेल दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crop Loan : धुळे जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना शेती कर्जवाटपासाठी दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अत्यंत निश्चांकी खरीप हंगाम पीककर्जवाटप झाले. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांवर अन्याय केला.

पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांचे या प्रक्रियेकडे सपशेल दुर्लक्ष असल्याचा आरोप शिवसेना (उबाठा)चे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी केला आहे.

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलेल्या पीककर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या बँकांवर शासन काय कारवाई करणार, असा सवालही माजी आमदार प्रा. पाटील यांनी उपस्थित केला आहे. (Only 20 percent crop loan allocation by nationalized banks in dhule news)

आमदार पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे, की यंदाचा खरीप हंगाम तीस३० टक्क्यांपेक्षा जास्त येणार नाही. कापूस, ज्वारी, मका, बाजरी ही प्रमुख पिके हातून गेलेली आहेत. शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात जगणे जिकिरीचे होणार आहे. परतीचा चांगला पाऊस न पडल्यास रब्बी हंगामही घेता येणार नाही, अशी स्थिती आहे. विहिरी, नाले, नद्या, तलाव अद्याप कोरडे पडले आहेत.

धुळे जिल्ह्यात पीकवाटपाचे यंदा ९४९ कोटी उद्दिष्ट होते. ते जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीयीकृत, खासगी व सहकारी बँकांना देण्यात आले होते. मात्र ऑगस्ट संपत आला तरी धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वगळता सर्वच बँकांनी पीककर्ज वाटपात अखडता हात घेतला आहे.

एकट्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने एकूण कर्जवाटपाच्या जिल्ह्याच्या हिश्शात तीस टक्क्यांपेक्षा जास्त व दिलेल्या उद्दिष्टापेक्षा १२२ टक्के कर्जवाटप केले आहे. इतर बँकांनी फक्त १५ ते १८ टक्के कर्जवाटप केले आहे. उद्दिष्टापेक्षा ८० टक्के पीककर्जवाटप राष्ट्रीयीकृत बँकांनी केले नाही, हे उपलब्ध आकडेवारीवरून सिद्ध होत आहे.

शिखर बँकेने मोठ्या प्रयासातून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कर्ज दिले. त्या कर्जातील ७२ कोटी जुन्या कर्जात जमा करून घेतले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

उर्वरित २८ कोटींपैकी सर्व तरतुदी वगळता फक्त दोन कोटी धुळे-नंदुरबार जिल्ह्याला वाढीव कर्जवाटपासाठी उपलब्ध झाले. शेतकऱ्यांची कर्ज मागणीची ओढ राष्ट्रीयीकृत बँकांकडे वाढली, मात्र राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ करतात हे दर वर्षीचे चित्र आहे.

धुळे जिल्ह्यात जुलैअखेर प्रमुख राष्ट्रीयीकृत बँक व सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना दिलेले पीककर्ज :

बँक शेतकरी पीककर्ज मिळालेले शेतकरी

बँक ऑफ बडोदा ४,६४८ ३०२

बँक ऑफ इंडिया २,५१६ ९९८

बँक ऑफ महाराष्ट्र ८,७३७ १,३४६

सेंट्रल बँक ऑफ इंडिया १९,२६७ ६,९०६

इंडियन बँक ३१८ ६२

पंजाब नॅशनल बँक ९३७ २०

स्टेट बँक ऑफ इंडिया ३२,६२५ ५,५६०

युको बँक ३३६ ३१

युनियन बँक ऑफ इंडिया ५,३७३ ९६६

कॅनरा बँक २,१५७ ९७८

एचडीएफसी बँक ४,५६६ २८४

आयसीआयसीआय बँक ४,२३५ १,१८७

आयडीबीआय बँक १,८०८ ३८९

धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक २०,६३५ २२०००+

...अन्यथा ठेवी काढणार

दरम्यान, पालकमंत्री, जिल्हाधिकारी व लीड बँकेचे व्यवस्थापक यांनी स्पष्ट भूमिका जाहीर करून राष्ट्रीयीकृत बँकांवर कारवाई न केल्यास संबंधित बँकांच्या कार्यालयापुढे व जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करून अशा बँकांतून शेतकरी व शेतकऱ्यांच्या नातेवाइकांनी ठेवलेल्या ठेवी इतरत्र वळत्या कराव्यात. यासाठी शिवसेना (उबाठा)च्या वतीने शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलनाचा कार्यक्रम राबविण्यात येईल, असा इशाराही प्रा. पाटील यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT