dam  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Water Scarcity : जिल्ह्यातील प्रकल्पांत अवघा 23.68 टक्के साठा; पाणीटंचाईच्या झळा

सकाळ वृत्तसेवा

Dhule Water Scarcity : जूनचे तीन आठवडे झाले, मात्र धुळे जिल्ह्यात अद्यापही पावसाचे दर्शन न झाल्याने मॉन्सूनच्या आगमनाकडे शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागले आहे. तापमानाचा पारा किंचित उतरला असला तरी असह्य उकाडा जाणवत आहे.

जिल्ह्यातील जलप्रकल्पातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. (Only 23 68 percent stock in water projects in district dhule news)

जिल्ह्यातील लघु व मध्यम पाण्याचा उपयुक्त साठा अवघा २३.६८ टक्के असून, अनेक गावांना पाणीटंचाई जाणवत आहे. गेल्या वर्षी याच दिवशी १९.९९ टक्के साठा होता. १ जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात अवघी १२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, गेल्या २४ तासांत कुठेच पाऊस झाला नाही. जोरदार पाऊस झाल्याशिवाय पाणीटंचाई दूर होणार नाही.

जिल्ह्यात लघु व मध्यम प्रकल्पात सध्या १०७.८९ दशलक्ष घनमीटर एवढाच साठा आहे. नंदुरबार जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पात ६९.४७ दशलक्ष घनमीटर म्हणजे ५३.८४ टक्के म्हणजे बऱ्यापैकी साठा आहे.

धुळे जिल्ह्यात १२ मध्यम व ४७ लघुप्रकल्प आहेत. प्रकल्पांची क्षमता ४९४.८६ दशलक्ष घनमीटर पाणी एवढी आहे. लघुप्रकल्पांची जलसंचयन क्षमता १२१.९७ दशलक्ष घनमीटर एवढी असताना अवघा १२.१९ दशलक्ष घनमीटर म्हणजे १०.७३ टक्के साठा शिल्लक आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मध्यम प्रकल्पाची जलसंचयन क्षमता ४७१.४३ दशलक्ष घनमीटर असून, सध्या ९५.७० दशलक्ष घनमीटर म्हणजेच २७.९८ टक्के साठा आहे. धुळे जिल्ह्यातील १२ प्रकल्पांपैकी सर्वांत जास्त ३०.७३ दशलक्ष घनमीटर साठा सुलवाडे प्रकल्पात आहे, तर सर्वांत कमी म्हणजे शून्य साठा सोनवद, कनोली प्रकल्पात आहे.

वाडीशेवाडी, अक्कलपाडा प्रकल्पातही मृतसाठा आहे. ४७ पैकी बहुतांश लघुप्रकल्प आटले आहेत. परिसरातील जामफळ, सोनवद, देवभाने, सातपायरी धरणात मृतसाठा आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त होत असल्याने यंदा प्रकल्प भरतील की नाही अशी शंका व्यक्त होत आहे.

आकडे बोलतात...

प्रकल्प, उपलब्ध साठा व टक्केवारी यानुसार (आकडेवारी दशलक्ष घनमीटरमध्ये)

१) पांझरा - ९.८० २७.५०

२) मालनगाव - २.२१ १९.५१

३) जामखेडी - ३.११ २५.२०

४) कनोली - ०.०० ०.००

५) बुराई - १.९३ १३.५८

६) करवंद - ३.२७ १७.९१

७) अनेर - १५.६० ३१.६६

८) सोनवद - ०.०० ०.००

९) अमरावती -०.०५ ०.२४

१०) सारंगखेडा बॅरेज २२.५१ २९.४१

११) सुलवाडे - ३२.७३ ५०.३१

एकूण मध्यम प्रकल्पात - ९५.७० २७.९८

एकूण लघुप्रकल्पात - १२.१९ १०.७३

एकूण साठा. १०७.७९ २३.६८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT