crime
crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : 16 लाखांचा पानमसाला, गुटखासाठा जप्त

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : शहरातील सहारा टाउनजवळील शुभम पार्क येथील एका घरात अवैध पानमसाला गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचा पथकाने कारवाई करीत १६ लाखांचा गुटखा जप्त केला.

या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.(Pan Masala worth 16 lakhs Gutkha stock seized nandurbar crime news )

सचिन भगवान पाटील (रा. प्लॉट नं. १८ बी., शुभम पार्क, सहारा टाउनजवळ, नंदुरबार) याच्या घरालगत कंपाउंडच्या गेटमध्ये प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूचा बेकायदा साठा केलेला आहे, अशी माहिती गुप्त बातमी अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांना मिळाली.

श्री. तांबे यांनी नंदुरबार उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन तसेच नंदुरबार शहर पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार यांना आदेशित केले. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी आनंद पवार यांना माहिती दिल्याने तेदेखील पथकासह हजर झाले.

त्याअनुषंगाने पथकाने छापा टाकला असता पानमसाला व तंबाखूचा बेकायदा साठा मिळाला. संशयित आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. पोलिस पथकाने शिताफीने ताब्यात घेतले.

त्यास साठ्याबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी आनंद पवार यांनी हा साठा जप्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation Of School Girl In Akola: शालेय पोषण आहार बनवणाऱ्या व्यक्तीचा 9 वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

Dhule-Solapur Highway Accident: धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Euro 2024 : गतउपविजेत्या इंग्लंडची प्रतिष्ठा पणास! युरो फुटबॉलमध्ये धोकादायक स्वित्झर्लंडचे कडवे आव्हान

Anant & Radhika Sangeet : अनंत-राधिकाच्या संगीतसाठी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी केला नातवंडांबरोबर खास म्युझिक व्हिडीओ ; सोशल मीडियावर होतंय कौतुक

Maharashtra Live News Updates : भाजप नगरसेवक शिवसेनेच्या (UBT) वाटेवर? मनधरणीसाठी मोठ्या नेत्यांची पळापळ

SCROLL FOR NEXT