A cage set up to imprison leopards in Shiwar. The second photo shows a trap camera set up to detect leopards. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Leopard News : शेतकरी, जागल्यांसह मेंढपाळांमध्ये घबराट; नरभक्षक बिबट्याची पिंजऱ्याला हुलकावणी

सकाळ वृत्तसेवा

Dhule Leopard News : धुळे तालुक्यात नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळ, लहान बाळांवर हल्ल्याची शृंखला काही थांबत नसल्याचे चित्र आहे. देऊर खुर्द (ता. धुळे) शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात बालिका गंभीर जखमी झाली.

या पार्श्वभूमीवर वन विभागाने नरभक्षक बिबट्या जेरबंद व्हावा म्हणून दोन दिवसांपासून शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. (Panic among farmers due to leopard in dhule news)

साक्री, पिंपळनेर व धुळे विभागाच्या सुमारे २५ कर्मचाऱ्यांचा ताफा गस्तीवर आहे. बिबट्या जेरबंद व्हावा म्हणून वन विभागाने तीन ठिकाणी पिंजरे, तर पाच ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या दिसत असला तरी सोमवारच्या रात्रीपासून बिबट्या पिंजऱ्याला हुलकावणी देत आहे.

देऊर खुर्द शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळाची मुलगी जखमी झाली. स्वेटरमुळे मुलगी बचावली असली तरी शेतशिवारात राहणाऱ्या शेतकरी, जागल्यांसह मेंढपाळांनी धास्ती घेतली आहे. सोमवार (ता. २०)च्या रात्रीपासून वनकर्मचाऱ्यांनी गस्त वाढविली असली तरी चाऱ्यासाठी भटकंती करणारे मेंढपाळ, शेतकरी मात्र भयभीत झाले आहेत.

वन विभागाच्या दक्षता विभागाचे विभागीय वनाधिकारी राजेंद्र सदगीर, सहाय्यक उपवनसंरक्षक तथा पिंपळनेर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी डी. आर. अडकिने, गस्तीपथकाचे वनक्षेत्रपाल आशुतोष बच्छाव, धुळे प्रादेशिक‌ वन विभागाचे वनक्षेत्रपाल भूषण प्रभाकर वाघ, वन विभागाच्या पश्चिम घाटचे वनक्षेत्रपाल गिते, गस्तीपथकाचे वनपाल एस. जी. जाधव, वनपाल पी. ए. पाटील, म्हसदीचे वनपाल डी. पी. पगारे, वन विभागाच्या पिंपळनेर, साक्री, धुळे मंडळातील वनकर्मचारी तैनात आहेत.

मेंढपाळांची रात्र वैऱ्याची

खरीप हंगामाच्या काढणीनंतर मेंढपाळ बांधव चाऱ्याच्या शोधार्थ भटकंती करत असतात. दिवसभर मेंढ्यांच्या मागे फिरणाऱ्या मेंढपाळांना बिबट्याच्या भीतीमुळे रात्र-रात्र जागून काढावी लागत आहे. ‘साहेब, दिवस मेंढ्यांच्या मागे फिरण्यातच जात असला तरी बिबट्या, मागून येईल का पुढून? या भीतीने समधी रात्र जागून काढावी लागते बघा...!’ अशी आर्त भावना मेंढपाळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर व्यक्त करत आहेत.

तथापि, दोन-तीन दिवसांनंतर चाऱ्यासाठी या शिवारातून त्या शिवारात भटकंती करणाऱ्या मेंढपाळांना दररोज भीतीत जगावे लागत असल्याचे वास्तव आहे. कधी बिबट्या जेरबंद होईल याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असली तरी दररोज भिन्नभिन्न शिवारात मुक्काम करणाऱ्या मेंढपाळांचा संरक्षणाचा प्रश्न मात्र ऐरणीवर आहे.

पिंजऱ्याला बिबट्याचा ‘खो’

देऊर खुर्द शिवारात ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या दिसत असल्याने याच भागात बिबट्याचा अजूनही मुक्काम असण्यास वनकर्मचाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. नरभक्षक बिबट्या सहज जेरबंद व्हावा म्हणून तीन ठिकाणी पिंजरेही लावले आहेत.

पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून बोकडाची मेजवानी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पण सावध बिबट्या हुलकावणी देत आहे. बिबट्या जेरबंद व्हावा म्हणून वन विभागास प्रतीक्षा आहेच. वन विभागास देऊर खुर्द शिवारात बिबट्याच्या पावलांचे ठसे व विष्ठा आढळून आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT