Experts of the company informing the farmers about papaya cultivation technology and various diseases of the crop in the workshop esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Agriculture News : हवामान बदल, तापमानवाढीमुळे पपई पीक अडचणीत

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Agriculture News : नोन यू सीड इंडिया प्रा.लि. व क्रोमिस बायोटेक प्रा.लि., पुणे यांच्यातर्फे पपई लागवडीचे आधुनिक तंत्र या विषयावर येथील दोंडाईचा रस्त्यावरील बालाजी लॉन येथे कार्यशाळा झाली.

नंदुरबार जिल्हा फळबागायतदार संघटनेचे अध्यक्ष अभिजित पाटील तसेच जिल्हाभरातून शेकडो पपई उत्पादक शेतकरी उपस्थित होते.(Papaya crop damage due to increasing temperature nandurbar agriculture news)

कंपनीचे अगस्ती गोवर्धन, कौस्तुभ राऊत, सचिन भिडे, महेश गुरव, अशोक जाधव यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. त्यांनी सांगितले, की राज्यात सर्वाधिक पपई लागवड खानदेशात केली जात असून, त्यात नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्र लागवड आहे. यापैकी साडेचार हजार हेक्टर एकट्या शहादा तालुक्यात लागवड आहे.

त्यापाठोपाठ धुळे जिल्ह्यात एक हजार ५०० हेक्टर व जळगाव जिल्ह्यात दोन हजार हेक्टरवर पपई लागवड आहे. पपई लागवडीतून शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळत होते; परंतु हवामान बदल, जागतिक तापमानवाढीमुळे गेल्या दोन ते तीन वर्षांत पपई पिकावरील अनेक समस्यांनी हे पीक अडचणीत आले आहे.

गेल्या १५ ते २० वर्षांत सेंद्रिय कर्बाचा साठा वापरून सेंद्रिय कर्ब संपुष्टात आणला, त्याचे योग्य प्रमाणात पुनर्भरण केले नाही हे मुख्य कारण आहे. त्यामुळे जमिनीच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला, त्यामुळे जमिनीची हवा आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी झालेली आहे व जमिनीतील उपयुक्त जिवाणू, बुरशी यांची संख्या कमी झाल्यामुळे नगदी पिके पपई, केळी, द्राक्षे, कापूस, मिरची इत्यादी एक पीक पद्धतीमुळे, हवामान बदलामुळे ठराविक कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे.

जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी झालेला असून, जमिनीचा सामू व ईसी वाढल्यामुळे शेतकऱ्यांना पूर्वी मिळत असलेले पपईचे दर्जेदार उत्पादन कमी झालेले आहे. त्यामुळे पपई पीक विविध कीड व रोगांना बळी पडून पिकांमधील व्हायरस, फुलगळ, फळगळ इत्यादी समस्या जाणवत असून, उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे.

शेतकरी वाढत्या उत्पादन खर्चामुळे व कमी उत्पन्नामुळे अडचणीत असून, या अडचणीस तोंड देण्यासाठी नोन यू सीड इंडिया प्रा.लि. पुणे व कोमिस बायोटेक प्रा.लि., पुणे या कंपनीतर्फे गेल्या वर्षभरात जमिनीचे आरोग्य, पिकाचे आरोग्य, जमिनीतील सेंद्रिय कर्ब, सामू, ईसी, कीड व रोग, एकात्मिक व्यवस्थापन, पीक व्यवस्थापन, जैविक खते, औषधे, हवामान बदल आधारित पीकपद्धती इत्यादींचा गरजेवर आधारित वापर करून उत्तम पद्धतीने पपई पिकाचे उत्पादन घेतले जाऊ शकते, असे या वेळी वक्त्यांनी सांगितले.

पपई पिकातील मुख्य समस्या व्हायरस

-पपया रिंग स्पॉट व्हायरस

-लीफ कर्ल व्हायरस

-तण व्यवस्थापन, फुलगळ, फळगळ समस्या, जमिनीचे आरोग्य, हवामान बदल

-उपयुक्त जिवाणूंचा वापर

-एकात्मिक पीकपद्धती

-मिश्र पीकपद्धती, बॉर्डर क्रॉप

-इन्सेकनेट हाउसमधील पपई लागवड, उत्तम रोपांची निवड

-लागवडीचे अंतर, पपईमध्ये प्लॅस्टिक मल्चिंग व ऑरगॅनिक मल्चिंग इ. चा वापर

-पपई लागवडीच्या उत्तम पद्धती, तण व्यापस्थापन आदींचे नियोजन केल्यास अधिकाधिक उत्पादन मिळू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT