SYSTEM
उत्तर महाराष्ट्र

Penalty Amnesty Scheme : पाच दिवसात मनपा तिजोरीत 2 कोटी 16 लाख!

सकाळ वृत्तसेवा

धुळे : मालमत्ता थकबाकीदारांना दिलासा देऊन थकबाकी वसूल करण्याच्या अनुषंगाने महापालिकेतर्फे शास्ती माफी योजना जाहीर झाली.

या योजनेत गेल्या पाच दिवसात दोन कोटी १६ लाख रुपयांवर कर (Tax) वसुली झाली तर तब्बल एक कोटी २७ लाखांवर शास्ती माफ झाली आहे. या योजनेचा शनिवारी (ता.११) शेवटचा दिवस असून मनपासह लोकअदालतीत कर भरता येईल. (Penalty Amnesty Scheme 2 crore 16 lakh in municipal treasury in 5 days dhule news)

मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करूनही अपेक्षित वसुली होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच, थकबाकीदारांना दिलासा देऊन कर वसुली करण्याच्यादृष्टीने महापालिका आयुक्तांनी मालमत्ता करावरील शास्ती (दंड) माफीचा निर्णय घेतला.

त्यानुसार ६ ते ११ फेब्रुवारीदरम्यान शंभर टक्के शास्ती माफीचा निर्णय घेऊन थकबाकीदारांना कर भरण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले. या योजनेत पहिल्या दिवशी एकूण १६ लाख सात हजार १४४ रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले होते.

पहिल्या दिवशी फारसा प्रतिसाद नव्हता. त्यामुळे उर्वरित दिवसात किती थकबाकीदार योजनेचा लाभ घेऊन थकबाकी अदा करतात याकडे लक्ष होते. त्यानंतरच्या चार दिवसात अर्थात ७ ते १० फेब्रुवारीदरम्यान तुलनेने बरा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

दोन कोटींवर वसुली

शास्ती माफी योजनेंतर्गत ६ ते १० फेब्रुवारी या पाच दिवसात एकूण दोन हजार २६९ थकबाकीदारांनी आपल्याकडील थकबाकी भरून योजनेचा लाभ घेतल्याचे पाहायला मिळाले. यातून महापालिकेच्या तिजोरीत एकूण दोन कोटी १६ लाख ६६ हजार ३८० रुपये जमा झाले.

दरम्यान, शंभर टक्के शास्ती माफी असल्याने यात एका अर्थाने महापालिकेला तोटाही सहन करावा लागला आहे. गेल्या पाच दिवसात ज्या दोन हजार २६९ थकबाकीदारांना तब्बल एक कोटी २७ लाख ७८ हजार ६८२ रुपये शास्ती माफी देण्यात आली.

शेवटचा दिवस

दरम्यान, शास्ती माफी योजनेचा शनिवारी (ता.११) शेवटचा दिवस आहे. शनिवारी धुळे जिल्हा न्यायालयात होणाऱ्या लोकअदालतमध्ये तसेच मनपातही कर अदा करून या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेचा लाभ घेताना काही अटी-शर्ती आहेत. यात यापूर्वी शास्तीची सर्व रक्‍कम अदा केलेल्या मालमत्ताधारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

तसेच योजनेंतर्गत कोणत्याही स्वरूपाचा परतावा दिला जाणार नाही, या योजनेचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदारांना मालमत्ता कराचा संपूर्ण भरणा करणे आवश्यक राहील, मालमत्ता करांसंबंधी न्यायालयात दावा प्रलंबित असल्यास प्रथमतः: सदर दावा न्यायालयातून काढून घेऊन त्याची कागदपत्रे सादर केल्यानंतर शास्ती माफी योजनेचा लाभ घेता येईल.

पाच दिवसातील स्थिती

तारीख...मनपा तिजोरीत जमा...शास्तीमुळे सूट

६ फेब्रुवारी............१६,०७,१४४...११,५१,४५३

७ फेब्रुवारी............३६,७१,४१२...२२,५४,५९३

८ फेब्रुवारी............३८,८४,५२५...१९,१४,५१३

९ फेब्रुवारी............५२,१७,१६०...२८,३२,९९२

१० फेब्रुवारी..........७२,८६,१३९...४६,२५,१३१ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे 46,178 मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT