Dhajapani: Slow and poor quality work. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : लोहारे गावातील पुलाच्या दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह

सकाळ वृत्तसेवा

तळोदा : सातपुड्याच्या दुर्गम भागातील मालदा ते धजापाणी रस्त्याचे संथगतीने व निकृष्ट दर्जाचे होत असलेले काम तसेच लोहारे गावातील पुलाच्या दर्जाबाबत आमदार राजेश पाडवी यांनी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित करीत, संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.

त्यावर उत्तर देताना बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनीदेखील सबधितांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता संबंधित ठेकेदारावर काय कारवाई होईल, याबाबत उत्सुकता आहे. (Pending clearance regarding quality of bridge in Lahore village MLA Rajesh Padvi demand to blacklist contractor in the winter session jalgaon news)

नागपूर येथे सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून मंगळवारी (ता. २७) अधिवेशनात शहादा-तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला. त्यात त्यांनी म्हटले की, नाशिक विभागातील धुळे, नाशिक व विशेषतः नंदुरबार जिल्ह्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाची विविध रस्त्याची कामे नंदुरबार येथील नीलेश इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनीमार्फत करण्यात येत आहेत.

मात्र वर्षानुवर्ष नीलेश इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांनी ही कामे दिरंगाईने केली असून त्यांच्या बेजबाबदारपणामुळे परिसरातील विकास कामांना गती मिळालेली नाही. सातपुड्याच्या दुर्गम भागातील मालदा ते धजापाणी तसेच अक्राणी रस्त्याचे काम अतिशय संथगतीने व निकृष्ट दर्जाचे होत आहे.

गेल्या पाच वर्षापासून रखडलेल्या रस्त्यांचा कामामुळे स्थानिक नागरिकांना रस्ते अपघातांसह विविध वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच लोहारे गावातील पुलाच्या दर्जाबाबत देखील आमदार राजेश पाडवी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

नीलेश इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या भोंगळ कारभारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्व परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या नीलेश इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, नंदुरबार या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी हिवाळी अधिवेशनात सभागृहाच्या पटलावर आमदार राजेश पाडवी यांनी केली.

त्यानंतर उत्तर देतांना बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी संबंधित ठेकेदाराची चौकशी करण्यात येईल व त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे आता संबंधित ठेकेदारावर खरच कारवाई होते का किंवा काय कारवाई होते याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

आमदार जयकुमार रावलांची साथ

नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात आमदार राजेश पाडवी यांनी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याबाबत लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला असता लागलीच आमदार जयकुमार रावल यांनी त्यांना साथ दिली आणि अश्या ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर देखील कार्यवाहीची मागणी केली.

ठेकेदाराचा निगरगट्टपणा -

सातपुड्यातील दुर्गम भाग असलेला धजापाणीला विकासाचा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत २०१७ पासून ही कामे होत आहेत. मात्र सदर कामे अतिशय संथगतीने व दर्जाहीन होत असल्याने यापूर्वी देखील लोकप्रतिनिधींनी या कामाबाबत संताप व्यक्त करीत ठेकेदाराने कामाची गुणवत्ता राखावी अशी सूचना केल्या होत्या. मात्र संबंधित ठेकेदाराने त्यातून काहीच धडा न घेतल्याने आजची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

26/11 Mumbai Attack: 9 वर्षाची सर्वात लहान साक्षीदार... कसाबच्या विरोधात कोर्टात दिली होती साक्ष! कोण आहे ती मुलगी

Weather today : राज्यात गारठा वाढला, किमान तापमान 9.6 अंशांवर, उत्तरेतील थंडीच्या लाटेमुळे पारा आणखी घसरणार

Shaktikanta Das: RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांची प्रकृती खालावली, चेन्नईच्या रुग्णालयात दाखल

Share Market Opening: भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी तेजीत; बँकिंग-आयटी शेअर्समध्ये जोरदार वाढ

PAN 2.0 Project: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; करदात्यांना QR कोड असलेले नवीन पॅन कार्ड देणार

SCROLL FOR NEXT