Citizens changing the roofs of their houses before monsoon.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Mansoon News : पड रं पाण्या, पड रं पाण्या... कर पाणी पाणी..! केविलवाण्या बळीराजाची आळवणी

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : दिवसभर सोसायट्याचा वारा... अन् नुसताच धुरळा... निम्मा जून संपला तरी पावसाचा टिपूसही नाही.

'सर्वत्र पेरण्या खोळंबल्या असून, काळजीने व्याकूळ झालेला बळीराजाच्या तोंडी आता गायक प्रल्हाद शिंदे यांचे ‘पड रं पाण्या, पड रं पाण्या, कर पाणी पाणी! शेत माझं लंय तान्हीलं, चातकावणी...’ या गीतातील ओवीप्रमाणे बळीराजासह सर्वसामान्य नागरिक पावसासाठी आळवणा करीत आहे. (people farmers are waiting for rain in shahada nandurbar news)

जून महिन्याचा पहिला पंधरवडा संपला तरी शहादा तालुक्यात अद्यापही पावसाची चिन्हे दिसून येत नाही. त्यातच सिंचन प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा असल्याने बागायती क्षेत्रही धोक्यात आले आहे. दर वर्षी तालुक्यात १५ जूनपर्यंत मॉन्सूनपूर्व पावसाचे आगमन होऊन शेतकरी पेरणीपूर्व मशागत पूर्ण करून घेतो मात्र यंदा जूनची १९ तारीख आली तरी पावसाची चिन्हे दिसत नाहीत.

गुजरातमधील बीपरजॉय चक्रीवादळामुळे तालुक्यातही चार-पाच दिवसांपासून २० ते २५ किलोमीटर वेगाने जोराचे वारे वाहत आहेत. बळीराजा दररोज आज ना उद्या येईल या आशेवर जगत असून, पेरणीची आस लागून आहे.

बागायती क्षेत्रही ऑक्सिजनवरच

दरम्यान, तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बागायती शेती केली जाते. त्यात बहुतांश शेतकऱ्यांनी पपई व केळी या फळ पिकाची लागवड केली आहे. अत्यंत महागडी रोपे लागवड केल्यानंतर उन्हामुळे त्यांची निगा राखताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यातच विजेचा होणारा लपंडाव यामुळे पिकांना मुबलक पाणी मिळत नसल्याने पिकेही माना टाकत आहेत. निदान वीज वितरण कंपनीने तरी वीजपुरवठ्यात सातत्य ठेवून सुरळीत ठेवावा, अशी मागणी कायम आहे.

सिंचन प्रकल्पांत अत्यल्प साठा

तालुक्यातील सर्व सात सिंचन प्रकल्पांमध्ये अत्यल्प साठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे प्रत्येक धरणाच्या परिसरात भूजल पातळी खोलवर जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. मॉन्सूनचा पाऊसही लांबणीवर पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत हवालदिल झाला आहे.

सिंचनाच्या दृष्टीने वरदान ठरलेले सुसरी प्रकल्प व लोंढरे धरणात अवघा २० टक्के साठा शिल्लक असल्याने मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तालुक्याच्या सीमेवर असलेले दरा धरण, दुधखेडा, काकरदा, लोंढरे आदींसह लहान-मोठ्या प्रकल्पात शिल्लक साठा टिकविण्याच्या प्रयत्न सुरू आहे.

पाऊस लांबणार

परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून दिवसभर सोसायट्याचे वारे वाहत आहे. त्यासोबत जमिनीवरील धुरळा हवेत उडत आहे. त्यामुळे शेतामध्ये काम करणारे शेतकरी वाहनचालक धुरळा डोळ्यात जाऊन त्रस्त झाले आहेत. मोकळ्या वाऱ्याने पाऊस लांबण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे.

घरांची दुरुस्ती अद्यापही सुरू

पावसाळा लांबला असल्यामुळे घरांची दुरुस्तीही हळुवार सुरू आहे. जिल्ह्याची भौगोलिक व आर्थिक परिस्थिती पाहता सर्वत्र एकसारखी घरे नाहीत. काही ठिकाणी धाब्याची, कुडाची, कौलारू, तर काही ठिकाणी स्लॅबचे बंगले आहेत. त्यामुळे पावसाअगोदर कौलारू घरांची कौले बदलण्याचे काम सध्या सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT