शिरपूर : शहरातील हार्डवेअर साहित्य विक्रीचे दुकान फोडून सुमारे १५० नळ चोरून नेल्याच्या गुन्ह्यात शहर पोलिसांनी दोघांना अटक केली.
त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयितांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. (Pipe thieves arrested in Shirpur 60 thousand seized Dhule Crime)
शहरातील रिक्रिएशन गार्डनजवळ पत्र्याच्या बांधणीचे बजरंग हार्डवेअर दुकान संशयितांनी १४ नोव्हेंबरला रात्री फोडले होते. पत्रा उचकटून दुकानात प्रवेश करून व्हिक्टोरिया कंपनीचे महागडे नळ संशयितांनी चोरून नेले.
दुकानमालक प्रदीप किशोर शिरसाट (रा. ताजपुरी, ता. शिरपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर यांना शहरातील पाचकंदील परिसरात दोन संशयित प्लंबिंग नळ पिशव्यांमध्ये घेऊन विक्रीच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली.
आगरकर यांच्या आदेशावरून शोधपथकाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून खंडेराव मंदिराकडे जाणाऱ्या दोघांना मुद्देमालासकट पकडले. संशयितांमध्ये सूर्यकांत तथा सोनू चंद्रकांत कलाल (वय २४, रा. रामसिंहनगर, शिरपूर) व सतीश गोविंद महाजन (३८, रा. वरवाडे, शिरपूर) यांचा समावेश आहे.
त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयितांवर गुन्हा दाखल करून येथील न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.
पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ए. एस. आगरकर, उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, शोधपथकाचे हवालदार ललित पाटील, पोलिस नाईक रवींद्र आखडमल, हवालदार विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, भटू साळुंखे, सचिन वाघ, मनोज महाजन, आरिफ तडवी, विजय पाटील यांनी ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.