Dhule: Hrishikesh Reddy, Bajirao Patil, Vijay Chinchole, Pramod Patil etc. while inspecting the market committee. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Market Committee : बाजार समितीत आता पोलिस गस्त; शेतमालाची चोरी रोखण्यासाठी बैठकीत निर्णय

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रात्री शेतमाल, व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला माल चोरीस जातो. असले प्रकार रोखण्यासाठी बाजार समितीत रात्री-अपरात्री पोलिस गस्त ठेवली जाईल, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक हृषीकेश रेड्डी यांनी दिली.

या संदर्भात बाजार समितीचे पदाधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय झाला. बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील यांनी रात्री पोलिसांच्या गस्तीची मागणी केली होती.

(Police patrol now in market committee Deputy Superintendent of Police Hrishikesh Reddy Decision in the meeting to prevent theft of farm produce Dhule News)

बकरी ईदनिमित्त बाजार समितीच्या आवारात शांतता प्रस्थापित व्हावी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस उपअधीक्षक रेड्डी यांनी बाजार समितीला भेट दिली.

बाजार समितीच्या सभागृहात सभापती पाटील तसेच संचालक, बाजार समिती प्रशासनाची संयुक्त बैठक झाली. पोलिसांनी विविध सूचना देत स्थितीचा आढावा घेतला.

आमदार कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीत शेतकरीहिताचे निर्णय घेतले जात आहेत. त्यात शेतमालाची चोरी रोखण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी सूचना आमदार पाटील यांनी बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली होती.

सभापती पाटील यांनी सांगितले, की बाजार समितीत रात्री शेतमालाची चोरी होते. ती रोखण्यासाठी पोलिसांची रात्री-अपरात्री गस्त असावी. त्यामुळे शेतमालाचे रक्षण होऊन शेतकरी, व्यापाऱ्यांचे नुकसान टळले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्याबाबत पोलिस उपअधीक्षक हृषीकेश रेड्डी यांनी तातडीने निर्णय घेत बाजार समितीत रात्रीनंतर पोलिस गस्तीची मागणी मान्य केली. ईदच्या पार्श्‍वभूमीवर शांतता व सलोखा राखण्यासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन श्री. रेड्डी यांनी केले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद जैन, संचालक विजय चिंचोले, महादेश परदेशी, भागवत चितळकर, माजी संचालक गंगाराम कोळेकर, प्रभारी सचिव देवेंद्र पाटील, सहाय्यक सचिव विशाल आव्हाड, देवेंद्रसिंग सिसोदिया आदी उपस्थित होते.

दहा दिवस ‘त्यांची’ विक्री बंद

येथील बाजार समितीत २० जून ते २९ जूनपर्यंत निरुपयोगी बैल, गोऱ्हा, गाय व भाकड जनावरांच्या खरेदी-विक्रीचा व्यापार, व्यवहार बंद ठेवण्यात आला आहे. तशी जनावरे विक्रीसाठी आणू नयेत, असे आवाहन सभापती पाटील यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावावर 10 लाखांचे बक्षिस; कोण आहे अनमोल बिश्नोई?

Diwali 2024: दिवाळीत घराची स्वच्छता करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, काम होईल सोपे

Nagpur East Assembly Election : भाजपच्या ‘कृष्णा’ला अजित पवार गटाच्या आभा यांचे आव्हान, आभा पांडेंकडून अर्ज दाखल

NCP Jalgaon Vidhansabha 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देवकर, खोडपे, खडसेंना उमेदवारी!

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीला सुरुवात

SCROLL FOR NEXT