Dhule Crime News : प्रतिबंधक कारवाई करुन अटक न करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच घेताना येथील पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक लक्ष्मीकांत पंढरीनाथ टाकणे याला धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (ता.22) दुपारी रंगेहाथ पकडले.(police took bribe to avoid arrest dhule crime news)
शहरातील एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. गुन्ह्यावरुन प्रतिबंधक कारवाई करून अटक न करण्यासाठी टाकणे याने संबंधिताकडे दीड हजार रुपयांची मागणी केली.
संबंधिताने त्याबाबत धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती कळविली. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला. बुधवारी दीड हजार रुपये स्वीकारताना टाकणे याला रंगेहाथ पकडण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रूपाली खांडवी, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.