Ner: Damaged fuse box in Rohitra.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शेतीपंपाच्या रोहित्रांची दुरवस्था; शेतकऱ्यांकडून रोहित्रांची स्वखर्चातून दुरुस्ती

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : नेर येथील शेतीपंपाच्या अनेक रोहित्रांची दुरवस्था झाली असून याठिकाणी पावसाळ्यात दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

येथील भदाणे शिवारातील रोहित्राच्या दुरवस्थेबाबत नेर येथील विद्युत महावितरण कार्यालयातील कनिष्ठ अभियंता यांना तक्रार देऊनही शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. कटआऊट शिल्लक नाहीत. (Poor condition of agricultural pumps Repair of Rohitras by farmers at their own expense Dhule News)

केबल उपलब्ध नाहीत. ऑर्डर केली आहे. वरिष्ठ कार्यालयात कळविले आहे. असे नियमित उडवाउडवीची उत्तरे येथील शेतकऱ्यांना मिळतात. शेताला, पिकाला वेळीच पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांना रोहित्र व विजेच्या बाबतीत सतर्क राहावे लागते.

येथील शेतकरी पोटाला चिमटा देऊन रोहित्रासाठी लागणाऱ्या कटआऊट, केबल, लग, डीओ तारा, कधीकधी रोहित्रातील कमी झालेल्या ऑईलची मात्रा स्वखर्चातून करीत असल्याची स्थिती आहे.

साधा वायररोप जळाल्यास शेतकऱ्यांनी नेर विद्युत महावितरण कार्यालयात तक्रार केली तर आधी वीजबिल भरणा करा त्याचवेळी रोहित्र सुरु करण्यात येईल. असे उत्तरे शेतकऱ्यांना देत असल्याची स्थिती आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कांद्याचे पीक असताना येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक शेतीपंप वीज विद्युत पुरवठा खंडित केला होता. परंतु येथील शेतकऱ्यांनी यापूर्वी तब्बल ४ तास रास्ता रोको आंदोलन करून आत्मदहनाचा इशारा दिला होता.

त्यावेळी तत्काळ वीज जोडणीचा निर्णय वरिष्ठांनी घेतला. आता रोहित्रावरील फ्यूज पेटीतील गोंधळामुळे शेतकरी, कर्मचारी यांची जीवितहानी झाल्यास येथील वरिष्ठ, कनिष्ठ अभियंता जबाबदार राहतील असे शेतकरी निंबा खलाणे, वंजी बोरसे, बन्सीलाल खलाणे, युवराज बोरसे, रूपचंद देवरे, ईश्वर बोरसे, गणेश खलाणे, छोटू देवरे, रामदास खलाणे, पंडित खलाणे, रामा जाधव, रणजित देसले, किशोर देसले आदी शेतकऱ्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT